आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येस बँक घोटाळा:शंभर कंपन्या स्थापन करून काळा पैसा ‘पांढरा’ करण्याचे कपूर कुटुंबीयांचे उद्योग

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येस बँक घोटाळा : डीएचएफएलसोबत व्यवहार, 5 हजार 50 कोटींची अफरातफर

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १०० हून अधिक छोट्या कंपन्या तयार करून पैसा ट्रान्सफर केला. राणा कपूरने तर त्याच्या पत्नीच्या मालकीच्या कंपनीला ८७ कोटी रुपये गिफ्ट म्हणून दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली अाहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढली आहेत.

डीएचएफएल ग्रुप आणि येस बँक यांच्यात सन २०१८ मध्ये झालेल्या व्यवहाराच्या मनी लाँडरिंग प्रकरणाची चौकशी ईडीने सुरू केली. यात ५ हजार ०५० कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाले आहे. हा पैसा आणि निधी हस्तांतरित करण्यासाठी कपूर कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांचा वापर करण्यात आल्याचेही उघड झाले आहे.

येस बँक घोटाळ्याबाबत सध्या विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी सुरू आहे. या चौकशीत १०० हून अधिक कंपन्या या कपूर कुटुंबाच्या मालकीच्या असल्याचे उघड झाले आहे. या सर्व फर्ममध्ये राणा कपूरही व्यवस्थापक होते. या कंपन्यांचा निधीचा वापर करण्यासाठी आणि मनी लाँडरिंगसाठी वापर केला जात होता.

पत्नीला ८७ कोटी रु.‘गिफ्ट’

आरएबी एंटरप्रायझेस राणा कपूरची पत्नी बिंदूच्या मालकीची आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही दुसरा स्रोत नाही. तरीही राणाने बिंदूच्या कंपनीला ८७ कोटी रुपये दिले. राणाने गिफ्ट म्हणून ही रक्कम दिल्याचा दावा ईडीने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...