आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Yogi Adityanath Mumbai Tour : If You Have The Courage, Take The Industry Out Of Maharashtra; Uddhav Thackeray's Challenge To Yogi Adityanath

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिल्मसिटीवर राजकारण:हिंमत असेल तर महाराष्ट्रातील इंडस्ट्री बाहेर नेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे योगी आदित्यनाथ यांना आव्हान

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्पर्धा असणे चांगले, पण कोणी धमकावले तर आम्ही सहन करणार नाही - मुख्यमंत्र्यांना इशारा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये लखनऊ महानगरपालिकेच्या बाँड लॉन्च केला. यानंतर योगी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची भेट घेणार आहेत. दरम्यान योगींच्या या दौऱ्यावरून वादही सुरू झाले आहेत. स्पर्धा असणे चांगले आहे. पण कोणाची धमकी आम्ही सहन करणार नाही, असा इशार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रातील उद्योग इथेच राहणार - मुख्यमंत्री

मंगळवारी संध्याकाळी इंडियन मर्चंट ऑफ चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांमध्ये आजही महाराष्ट्राचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणताही उद्योग बाहेर जाणार नाही. उलट इतर राज्यांतील उद्योगपती देखील महाराष्ट्रात येतील. असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

स्पर्धा असणे चांगले, पण..

उद्धव ठाकरे म्हणाले की, "स्पर्धा असणे चांगले आहे. पण कोणी आरडाओरडा करून, धमकी देत एखादा उद्योग बाहेर नेणार असतील तर मी तसे होऊ देणार नाही. आजही काही लोक तुम्हाला भेटतील आणि आमच्याकडे या म्हणतील." दरम्यान हिंमत असेल तर येथील उद्योग बाहेर नेऊन दाखवा अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी योगी यांचे नाव न घेता दिला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser