आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. उद्योजक आणि बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्तींची ते भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी योगी आदित्यनाथ बुधवारी दुपारी मुंबईत दाखल होणार आहेत.
उत्तर प्रदेशात उद्योग यावेत म्हणून मुंबईतील काही उद्योगपतींशी चर्चा करण्यासाठी ते मुंबईत येत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्यानंतर आता उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येत असल्याने या दौऱ्याची चांगलीच चर्चा होत आहे.
मुंबईतील ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी योगी आदित्यनाथ हे बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी दिवसभर भेटी आणि बैठका घेऊन चर्चा करणार आहेत. तर सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरातही जाणार आहेत.
2020 मध्ये फिल्म सिटीची घोषणा
गेली काही दिवस महाराष्ट्रातील उद्योग समूह राज्याबाहेर जात आहेत. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2020 मध्ये युपीत नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. त्यावेळी मुंबईतील चित्रपटसृष्टी उत्तर प्रदेशात नेण्यासंदर्भातही प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या झळकल्या होत्या. फिल्म सिटीसाठी त्यांनी यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी 1 हजार एकर जागा देखील राखून ठेवली असल्याचे सांगितले होते. यानंतर आज दुपारी ते मुंबई त येणार असून उद्योगपतींसह बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्तींची ते भेट घेणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे विसरू नका
युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, आमच्या मनात कोणत्याही राज्याविषयी द्वेष आणि सूड भावना नाही. राज्याचा विकास हा देशाचा विकास आहे, पण इकडले पळवून नेण्याला आमचा विरोध आहे. आम्ही इकडचे ओरबडून नेऊ, पळवून नेऊ या सर्व गोष्टीला आमचा विरोध आहे. या देशातील मोठे उद्योजक मुंबईत राहतात, मुंबई देशाची आर्थिक आणि औद्योगिक राजधानी आहे, पण ती आधी महाराष्ट्राची राजधानी आहे हे विसरू नका असे सांगतानाच महाराष्ट्रातील गुंतवणूक कायम ठेवत तिकडे नवी गुंतवणूक करण्यास आमचा काहीच आक्षेप नाही असेही राऊत यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.