आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिल्मसिटीवरून स्पष्टीकरण:आम्ही बॉलिवूड घेऊन जायला नाही, तर नवीन फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत : योगी आदित्यनाथ

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूड मुंबईतच राहणार, योगी आदित्यनाथ यांची ग्वाही

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगले होते. मात्र आम्ही बॉलिवूड घेऊन जायला आलो नाही, आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत. अशी प्रतिक्रिया योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच बॉलिवूड मुंबईतच राहील अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी दिली.

बॉलिवूड कुणीही घेऊन जायला ही काय पर्स आहे का?

योगी आदित्यनाथ म्हणाले की, "इथे कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. बॉलिवूड कुणीही घेऊन जायला ही काय पर्स आहे का? ही खुली स्पर्धा आहे. कुणासोबत भेदभाव न करता चांगले वातावरण देण्याची, सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. मुंबई फिल्मसिटी आपले काम करेल. उत्तर प्रदेशातील नवी फिल्मसिटी त्यांचे काम करेल, असेही आदित्यनाथ म्हणाले.

शिवसेनेला काढला चिमटा

पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, कुणीही कुणाची गुंतवणूक घेऊन जाणार नाही. कुणालाही बाधा आणायची नाही तर भारताची अर्थव्यवस्था वाढवायची आहे. मला वाटते हेच सर्वांचेही लक्ष असले पाहिजे, असा चिमटाही त्यांनी शिवसेनेला काढला.

वर्ल्डक्लास फिल्मसिटी बनवण्यासाठी बॉलिवूडकरांशी चर्चा

बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवे मॉडल तयार करायचे आहे. जागतिक दर्जाची फिल्मसिटी तयार करण्यासाठी बॉलिवूडकरांशी चर्चा केली. आम्ही कुणाचे काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नव निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असेही आदित्यनाथ म्हणाले.

अंडरवर्ल्डद्वारे बॉलिवूडवर दबाव टाकत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी - मंत्री रझा

उत्तर प्रदेशमधील फिल्म सिटीवरून सुरू असलेल्या राजकारणादरम्यान योगी सरकारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहसीन रझा यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अंडरवर्ल्डद्वारे बॉलिवूडवर दबाव टाकत आहेत. अनेक चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, कलाकारांना मुंबई सोडून उत्तर प्रदेशात यायची इच्छा आहे. मात्र त्यांना अंडरवर्ल्डद्वारे धमकावले जात आहे असा आरोप मोहसीन रझा यांनी केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser