आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचा योगींंवर आरोप:उद्योगपती, चित्रपट निर्माते यांच्यात भीती निर्माण करण्यासाठी मुंबईत येत आहेत योगीः कॉंग्रेस

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या बहाण्याने उद्योग आणि बॉलिवूड यूपीत घेण्याचे षडयंत्र: सावंत

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्‍यावर कॉंग्रेसने गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील उद्योगपती आणि बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांना धमकावले जाऊ शकते अशी शंका महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी व्यक्त केली. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योगपती आणि चित्रपट निर्मात्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे ते म्हणाले.

मुंबईत कार्यरत उत्तर प्रदेश पर्यटन विभागाचे उपसंचालक विमलेश कुमार औदिच्य यांनी सांगितले की, योगी आदित्यनाथ 2 डिसेंबर रोजी मुंबईत येत आहेत. येथे ते देशातील बड्या उद्योगपती, बँकर्स आणि सेलिब्रिटींच्या भेटी घेतील. यावेळी ते राज्यातील गुंतवणूक, प्रस्तावित फिल्म सिटी आणि फायनान्स सिटीबाबत चर्चा करतील.

मुख्यमंत्री बीएसई येथे लखनौ महानगरपालिकेच्या महानगरपालिका बांडचे प्रतीकात्मक उद्घाटन करतील. योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई भेटीची ही योजना पाहता कॉंग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना योगी आदित्यनाथ जबरदस्तीने बॉलिवूडमधील लोक आणि निर्मात्यांना यूपीत येण्याची धमकी देत आहे का यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

सुशांतच्या बहाण्याने उद्योग आणि बॉलिवूड यूपीत घेण्याचे षडयंत्र: सावंत
सचिन सावंत म्हणाले की, एनसीबीच्या माध्यमातून सुशांतसिंग राजपूत प्रकरण वर काढत राज्यातील उद्योग आणि बॉलिवूड महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात नेण्याचा कट रचला गेला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींशी चर्चा करून आपल्या राज्यात गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करतील. आमचा त्यांना सल्ला आहे की, त्यांनी पहिले उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावे. योगींचे राजकारण विघटनकारी आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser