आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे टोल प्राइस फीचर:गुगल मॅप्सवरून कळेल टोल टॅक्सची किंमत

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वापरकर्ते गुगल मॅपवरून त्यांच्या प्रवासादरम्यान आकारल्या जाणाऱ्या टोल टॅक्सच्या किमती पाहू शकतील, असे टेक कंपनी गुगलने घोषणा केली आहे. तुमही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यापूर्वीच टोलच्या दरांचा अंदाज लावू शकाल. ही सुविधा भारतासह यूएसए आणि इंडोनेशियाच्या जवळपास दोन हजार टोल रस्त्यांसाठी सुरू केली जाणार. हळूहळू ही सुविधा सर्व देशात लागू केली जाईल. नवे टोल प्राइस फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी असेल. तुम्ही जर टोल देऊ इच्छित नसाल तर ते अपडेटेड व्हर्जन अल्टरनेटिव्ह टोल फ्री मार्ग दाखवेल. यासाठी तुम्हाला अॅपच्या टॉपच्या राइट कॉर्नरमध्ये दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करावे लागेल. यात अव्हाइड टोल्सवर क्लिक करून पर्यायी मार्गाने जाऊ शकता.

बातम्या आणखी आहेत...