आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक नियोजन:तुम्ही केलेल्या बचतीच्या मदतीने आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल; मार्ग कोणताही असो, सुरू करा नियोजन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू झाले आहे. तुम्ही आतापासूनच आर्थिक नियोजन सुरू केले तर बरे होईल, जेणेकरून तुम्हाला करमाफीचा जास्तीत जास्त फायदा मिळेल आणि पुढील मार्चपर्यंत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक जण हे महत्त्वाचे काम वर्षअखेरपर्यंत पुढे ढकलतात. मग शेवटच्या क्षणी घाईघाईने निर्णय घेतात. आर्थिक नियोजनाची ही पद्धत हानिकारक ठरू शकते. खरं तर, जेव्हा तुमच्याकडे पूर्ण वर्ष असते, तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व आर्थिक गरजा बारकाईने पाहू शकता. उदाहरणार्थ, पुढच्या एका वर्षात तुमचे किती उत्पन्न असेल आणि सर्व खर्च काढून तुम्ही किती बचत करू शकाल याचा अंदाज आतापासून बांधणे अवघड नाही. तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टेदेखील कळतील, ज्यासाठी तुम्हाला बचत केलेली रक्कम गुंतवायची आहे. पर्सनल फायनान्सशी संबंधित या छोट्या कामांकडे आतापासून लक्ष दिल्यास संपूर्ण वर्ष तणावमुक्त जाऊ शकते. हे सर्व कसे करायचे ते जाणून घेऊया...

संपूर्ण वर्ष तणावमुक्त करण्यासाठी या सात गोष्टी करा
1. संतुलित बजेट तयार करा

तुमच्या उत्पन्नाची तीन प्रमुख गरजांमध्ये विभागणी करा. भाडे, ईएमआय, शाळेची फी, घरगुती खर्च, विमा प्रीमियम इत्यादी मूलभूत गरजा. हॉटेलचे जेवण, प्रवास, खरेदी इ. सारखे विवेकी खर्च. शेवटची, पण सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे बचत. किमान १०% बचत करण्याचा प्रयत्न करा. मूळ खर्च उत्पन्नाच्या ५०% पेक्षा जास्त असू शकतात.

2.कर नियम समजून घ्या
गृहकर्जाशिवाय व्याजावर कर सूट आणि क्रिप्टोकरन्सीवरील कर यांसारखे नवीन नियम १ एप्रिलपासून लागू झाले आहेत. ते जाणून घ्या आणि त्यांचा तुमच्या उत्पन्नावर आणि बचतीवर कसा परिणाम होईल ते समजून घ्या. पुढील १२ महिन्यांच्या उत्पन्नावर किती कर आकारला जाईल व ताेे कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारची गुंतवणूक करू शकता हे जाणून घ्या.
3. आपत्कालीन निधी उभारा
आपल्या सर्वांना बचतीची गरज आहे जी आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडू शकते. याला इमर्जन्सी फंड म्हणतात आणि तो सहसा मुदत ठेवीच्या (एफडी) स्वरूपात असतो. हा निधी तुमच्या मासिक उत्पन्नाच्या किमान ३-६ पट असावा. जर तुम्ही तेवढी बचत केली नसेल तर या वर्षी आणखी बचत करण्याचा प्रयत्न करा. हा निधी प्रत्येक कठीण प्रसंगी कामी येईल.

4. विमा कवच वाढवा
जीवन आणि आरोग्य विमा खूप महत्त्वाचे आहेत. नसेल तर नक्की घ्या. तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असणार्‍या कुटुंबातील सदस्यांची संख्या मोठी असेल, तर तुम्हाला टर्म प्लॅनची ​​गरज आहे. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरोग्य विमा आवश्यक आहे. या दोन्ही विम्यावर तुम्हाला कर सूटदेखील मिळते. या अर्थाने, त्यांना कर योजनेचा भाग देखील बनवता येईल. जर तुम्ही हा विमा घेतला असेल तर कव्हरेजची गरज वाढली आहे का ते पाहा.

गुंतवणुकीचे पर्याय शाेधा
5. या वर्षापासून नियमितपणे गुंतवणूक करण्याची सवय लावा. म्युच्युअल फंड किंवा भविष्य निर्वाह निधीमध्ये दरमहा गुंतवणूक करा. महिन्याच्या सुरुवातीला, प्रथम गुंतवणूक खात्यात पैसे टाका व उर्वरित पैसे खर्च करा. प्रत्येक गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्पष्ट असले पाहिजे. कर वाचवण्यासाठी ईएलएसएस किंवा पीएफमध्ये १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

6. कर्ज कमी करण्याची योजना आखा
तुमच्याकडे कर्ज असल्यास, या वर्षी ते कमी करण्याची योजना करा. तुमच्याकडे क्रेडिट कार्डचे कर्ज असल्यास, ते महागडे कर्ज असल्याने ते त्वरित परत करा. गृहकर्जासारखे मोठे कर्ज कमी करण्याचे सर्व मार्ग पहा. व्याजदर जास्त असल्यास, पुनर्वित्त किंवा शिल्लक हस्तांतरणाचा विचार करा. दर वाजवी असेल तर वाढत्या उत्पन्नासह इएमआय वाढवा.

7.क्रेडिट स्कोअर ७५० च्यावर न्या
कजर क्रेडिट स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. ईएमआय वेळेवर भरल्याने हा स्कोअर चांगला राहतो. क्रेडिट रिपोर्ट तपासून वर्षाची सुरुवात करा. तुमचा स्कोअर काय आहे ते शोधा. जर ते ७५० च्या खाली असेल तर वर्षाच्या अखेरीस ताे ७५० च्या वर वाढवण्याचे लक्ष्य ठेवा.

बातम्या आणखी आहेत...