आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांना आदित्य यांचे संबोधन:आयपीएलसारखे प्राईस टॅगवाले लोक नको; हृदयात, मनात शिवसेना जपणारे लोक हवे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंड करणाऱ्यांनी थोडा विचार करावा की त्यांचे स्वतःचे भवितव्य काय? कुणी शिवसेनेसोबत असते तर राज्यात राहूनच सांगितले असते. फक्त शरीराने शिवसेनेत असलेले आणि आयपीएलसारखी स्वतःची किंमत लावणारे लोक आपल्याला नको; तर हृदयात मनात शिवसेना जपणारे लोक आपल्याला हवेत अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकांच्या बैठकीत आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली.

शुक्रवारी रात्री नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हितगूज साधले. तत्पुर्वी आदित्यठाकरे यांनी आपली भूमिका नगरसेवकांसमोर मांडत त्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यमान स्थितीवर भाष्य केले.

दूर गेलेले विरोधक

आदित्य ठाकरे म्हणाले, आपल्यासोबत असलेले आपलेच आहेत पण आपल्यापासून दूर गेलेले विरोधक झाले आहेत. आम्ही 'वर्षा'वरून 'मातोश्री'वर येताना रस्त्यावर पाठींबा देणारे सामान्य शिवसैनिक होते. विरोधी पक्षात सत्ताधारी पक्षातून जाण्यासाठी जगातील हे एकमेव बंड असेल पण आपल्यासोबत लोकांचे आशिर्वाद आहेत. हृदयावर आणि मनावर प्रेम करणारे उद्धव ठाकरे एकमेव मुख्यमंत्री आहेत याची प्रचिती जगभर दिसते. कौतूक म्हणून नाही पण यशस्वी व्यक्तीचाच विचार लोक करतात.

सर्वेमध्ये मुख्यमंत्र्यांची छबी स्वच्छ

आदित्य म्हणाले, भ्रष्टाचार न करणारा, लोकांसाठी झटणारा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची छबी आहेत. जेही सर्वे झाले त्यात उद्धव ठाकरेंची छबी उंचावलेलीच दिसली. त्यांंची शस्त्रक्रिया झाली तेव्हा अनेकांनी गैरफायदा घेतला. रक्तात, हृदयात आणि मनात शिवसेना असलेले लोकच आपली आहेत, विकले गेलेले लोक आपले नाहीत. स्वतःची किंमत लावणारे लोक आपल्याला नको असेही आदित्य म्हणाले.

प्राईस टॅगवाले लोक नको

आदित्य म्हणाले, शिवसैनिक म्हटल्यानंतर संघर्ष ही नविन गोष्ट नाही. महाविकास आघाडी सरकार देशासाठी महत्वाचे असे लोक मला सांगतात. कोविडमध्ये पायाभूत सुविधा आणि विकासाचे काम थांबवले नाहीत. आयपीएलसारखे प्राईस टॅगवाले लोक आपल्याला नकोत.

बातम्या आणखी आहेत...