आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे तिसरे टिझर प्रदर्शित:'तुम्ही फक्त वज्र मुठ द्या, दात पाडायाचं काम मी करुन दाखवतो'; मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा टिझरमध्ये समावेश

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"तुम्ही मला फक्तं वज्र मुठ द्या! दात पडायाचं काम मी करुन दाखवतो! हिंदुत्वाचा खरा अर्थ दाखवून द्यायला आणि शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेण्यासाठी पुढे यायलाच हवे", असा इशाराच विरोधक आणि टीकाकारांना शिवसेनेच्या तिसऱ्या टीझरद्वारे देण्यात आला. शिवसेनेचे हे टिझर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेपुर्वी मुख्यमत्र्यांनी आपला इरादा स्पष्ट केला होता. जे उत्तर द्यायचे ते 14 मे रोजीच्या सभेत देईल असा इशाराच त्यांनी आपल्या टीकाकारांना आणि विरोधकांना दिला आहे. त्याच धर्तीवर आता या सभेसाठी शिवसेनेकडून मोठी तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सभेपुर्वीच्या जाहिरातीही सर्वत्र प्रदर्शित झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेना अधिकच आक्रमक होताना दिसत आहे.

टिझरमधून विरोधकांना इशारा

सभेच्या या आधीच्या टिझरबद्दल मनसेने आक्षेप घेत शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो वापरल्याचा आरोप शिवसेनेवर झाला. मनसे नेते गजानन काळे यांनी हा आरोप केला होता. त्यानंतर आता शिवसेनेचा तिसरा टिझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही विधान आहेत. या विधानांमधून ते विरोधकांवर आक्रमकपणे निशाणा साधताना दिसत आहेत.

"तुम्ही मला फक्तं वज्र मुठ द्या! दात पडायाचं काम मी करुन दाखवतो! हिंदुत्वाचा खरा अर्थ दाखवून द्यायला, शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घ्यायला, यायलाच पाहीजे", असं शिवसेनेच्या तिसऱ्या टीझरमध्ये म्हटलं आहे.

शिवसेनेकडून 8 मे रोजी उद्धव ठाकरेंच्या पहिल्या सभेचा पहिला टीझर लाँच करण्यात आला होता. पहिल्या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील अंश वापरण्यात आला होता. "मी शिवसेना प्रमुख जरुर आहे. पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे.", असं टीझरमध्ये बघायला मिळतंय. तसेच साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे, असं आवाहनंही शिवसेनेनं टीझरमधून केलं. दोन दिवसांपू्र्वी शिवसेनेकडून दुसरा टीझर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता तिसरा टीझर शेअर करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...