आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील जिम व्यवसाय:तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? जिम चालकांनी भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीसांशी माझं बोलणं झाले - राज ठाकरे

कोरोनाचा संसर्ग हा कमी होण्याचे नाव घेत नाहीये. हा धोका लक्षात घेता मार्च महिन्यांत लॅाकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिम व्यवसाय हे ठप्प झालेले आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिम चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुम्ही जिम सुरू करा, किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात असा सवाल राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

राज्यभरात 3 महिने लॉकडाऊन पाळण्यात आल्यानंतर आता अनेक व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच आता जिम उघडण्यास ही परवानगी देण्यात यावी अशी मागणी जिम चालक आणि मालकांनी केली आहे. मात्र तरी देखील सरकारकडून जिम सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर आज जिमचालकांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर राज ठाकरेंनी तुम्ही जिम सुरू करा, किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? असा सवाल सरकारला केला आहे. टीव्ही नाइन वृत्त वाहिनीने हे वृत्त दिले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, गोल्फ, टेनिस इतकं फिजिकल डिस्टन्सिंग कुठल्या खेळात नसतं. पण ते सुद्धा बंद आहे. बाजार सुरु आहेत. सगळीकडे सर्वच गोष्टी सुरु आहेत. मूर्खाचा बाजार सुरु आहे. केंद्र सरकार सांगत सुरु करा, मात्र राज्य सुरु करायला तयार नाही. मागे केंद्राने विमानतळ सुरु करायला सांगितले होते मात्र राज्य तयार नव्हतं. राज्याला वेगळी अक्कल आहे का ? असा सवाल त्यांनी केला.

फडणवीसांशी माझं बोलणं झाले - राज ठाकरे
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझं बोलणं झालेलं आहे. त्यांचंही म्हणणं आहे की जिम सुरु व्हायला पाहिजेत. आता मी सांगतोय, ओपन करा, जिम सुरु करा, ज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. काय होईल ते बघून घेऊ. असे राज ठाकरे जिम चालक-मालक यांच्या भेटीनंतर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...