आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:दररोज 65 हजार रेमडेसिविर मिळणार : डॉ.शिंगणे, सात कंपन्यांच्या बॅच येण्यास सुरुवात

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेला आठवडाभर राज्याला केवळ ३५ हजार रेमडेसिविरच्या कुप्या मिळत होत्या. मात्र सात कंपन्यांच्या बॅच येण्यास प्रारंभ झाला असून राज्याला दैनंदिन ६५ हजार रेमडेसिविर कुप्या बुधवार, दि. २१ एप्रिलनंतर प्राप्त होतील. त्यामुळे रेमडेसिविरचा राज्यातील तुटवडा संपुष्टात येईल, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने ब्रुक, बीडीआर आणि हिमाचल प्रदेश येथील निक्सी लॅब अशा तीन कंपन्यांना त्यांच्याकडचे निर्यातीचे रेमडेसिविर महाराष्ट्रात विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मात्र या कंपन्यांना राज्यातील खासगी व्यक्तींना विक्री करता येणार नाही. त्यांना केवळ महाराष्ट्र सरकारला रेमडेसिविर विकता येईल, असे शिंगणे यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयांमध्ये रेमडेसिविरचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवड्याबाबत पुरवठादार कंपन्यांसोबत बोलणी केली होती.

कमिशनमुळे निविदा रखडल्याचा आरोप तथ्यहीन
कमिशनमुळे रेमडेसिविरच्या सरकारी निविदा रखडल्याच्या प्रवीण दरेकर यांच्या आरोपात तथ्य नाही. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने बीडीआर कंपनीकडून ५ लाख रेमडेसिविरच्या कुप्या मागवल्या होत्या. मात्र कंपनीने परवान्याचे तांत्रिक कारण देत पुरवठा करण्यास असमर्थता व्यक्त केल्याचे शिंगणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...