आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:तुमची हुकूमशाही चालणार नाही, पवारांची राज ठाकरेंवर टीका, तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या : पवार

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही... अशी हुकूमशाही चालणार नाही... तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या... कायद्याने जे करायचे ते आम्ही करणार आहोत, असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. अल्टिमेटमची भाषा कुणी करू नये. कायद्याने हे सरकार चालते. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी योग्य त्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असेही अजित पवार म्हणाले.

अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणे योग्य नाही. जो काही निर्णय घ्यायचा ठरेल तो सर्वांना बंधनकारक आहे. वेगवेगळ्या धर्माला तो नियम लागू होईल, असे सांगतानाच अजित पवार यांनी उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने २००५ मध्ये निर्णय दिला होता त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याचे स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. राज्यात जी धार्मिक स्थळे आहेत, त्यांनी परवानगी घ्यावीच, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

ठरावीक दिवसांत परवानगी घ्यावी
सर्वांनी दिलेल्या ठरावीक दिवसांत परवानगी घ्यावी, नाही घेतली तर कठोर भूमिका घेतली जाईल. कायदा कुणी हातात घेण्याचा व तसं धाडस कुणी करू नये. न्यायालय जो निर्णय देईल त्याचे पालन करण्याचे सर्वांचे काम आहे. राज्यात उशिरा दहाच्या पुढे हरिनाम सप्ताह, जागरण, गोंधळ असे कार्यक्रम सुरू असतात. हे ग्रामीण भागात सुरू असते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करून सगळ्यांनी सहकार्य करावे. सध्या काही ठिकाणी आवाज कमी झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांनाच याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

विरोधकांचा रडीचा डाव
ओबीसीबाबत सरकारने योग्य भूमिका मांडली आहे. सभागृहात विरोधकांच्या मदतीने ठराव झाले आहेत. ओबीसींना आरक्षण मिळावे ही सरकारची भूमिका आहे. सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिला आहे. त्यावर आज बैठक मुख्यमंत्री घेत आहेत. पण शेवटपर्यंत ओबीसींना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. चांगले झाले तर आम्ही मिळून केले आणि चांगले झाले नाही तर मग ही सरकारची चूक आहे, असे विरोधक ओरडत आहेत, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

तृतीयपंथीय मुख्यमंत्री होऊ शकतो
मुख्यमंत्री कुठल्या जातीचा व्हावा, हा प्रश्न नाही. उद्या तृतीयपंथी सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो. १४५ चं बहुमत आणा आणि व्हा मुख्यमंत्री. कुणी अमूक जातीचा होईल, या बोलण्याने मुख्यमंत्री होत नसतो, असेही पवार म्हणाले. कोरेगाव भीमाची चौकशी सुरू आहे. आयोगाचा अहवाल आल्यावरच कुणाला क्लीन चिट दिली किंवा नाही हे समजेल, असेही त्यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...