आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठाणे:दहशत पसरवण्यासाठी तरुणाला नग्न करुन मारहाण, लॉकडाउनमुळे कोणी वाचवायलाही आले नाही

ठाणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी एफआयआर दाखल करुन दोन आरोपींना ताब्यात घेतले

ठाण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील काही लोकांनी परिसरात हदशत पसरवण्यासाठी एका तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण केली. यादरम्यान आरोपींना तरुणाच्या मारहाणीचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरलदेखील केला. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी एफआयआर दाखल करुन दोन आरोपींना अटक केली, तर तीन अद्याप फरार आहेत. पोलिस या फरार आरोपींचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोन असल्यामुळे तरुणाच्या मदतीलाही कोणी आले नाही. विशेष म्हणजे, या आरोपींना तरुणाला साखळी चोर असल्याचे सांगत मारहाण केली.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना अटक

घटनेच्या 8 दिवसानंतर आरोपींना व्हिडिओ व्हायरल केला. पोलिसांनी 24 जूनला तपास सुरू केला आणि सर्वात आधी पीडीत व्यक्तीची ओळख पटवली. तपासात समोर आले की, आरोपींना या परिसरात आपली दहशत पसरवण्यासाठी तरुणाला मारहाण केली. पीडीत तरुण या घटनेमुळे इतका घाबरला होता की, अनेक दिवसांपासून तो आपल्या घरातून बाहेरदेखील आला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...