आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ahemednagar Karjat Young Man Attack Whatsaap Status | Youth Critical In Murderous Attack By Group In Karjat; Both Were Arrested By The Police | Marathi News

प्रकृती चिंताजनक:कर्जतमध्ये स्टेटसवरुन वाद; एका गटाच्या खुनी हल्ल्यात युवक गंभीर, दोघांना पोलिसांकडून अटक

कर्जत6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात प्रतीक ऊर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला नगर येथे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून त्याला मारहाण करण्यात आली. आम्ही कायदेशीर कारवाई करत असल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख मनोज पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी शुक्रवारी कर्जत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शनिवारीही शहरात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली असून आठ जणांवर ॲट्रॉसिटीसह भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अमित राजेंद्र माने यांनी फिर्याद दिली. यात म्हटले की, सनी पवार व मी शहरातील अक्काबाईनगर परिसरामध्ये राशीन येथे अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमास जाण्यासाठी थांबलो असताना त्या ठिकाणी १० ते १५ युवकांनी गज, काठ्या, तलवारीने आमच्यावर हल्ला केला. यामध्ये सनी पवार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले. हल्लेखोरांनी या वेळी जातीय वाचक शिवीगाळ करून तलवारीने वार केले. “तू सारखे सोशल मीडियावर आय सपोर्ट नूपुर शर्मा असे स्टेटस ठेवत असतो व इन्स्टाग्रामवरही टाकत असतो, असे म्हणून तुझा आम्ही उमेश कोल्हे करू असे म्हणाले.” याप्रकरणी पोलिसांत शाहरुख खान पठाण, सोहेल पठाण, निहाल खान पठाण, इलाईल शेख, टिपू पठाण, आबरार ऊर्फ अरबाज कासम पठाण, हर्षद पठाण, अकीब सय्यद व इतर ५ ते ७ अनोळखी व्यक्तीविरोधात दाखल केला. या घटनेचा विविध हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध करीत कर्जत बंदची हाक दिली होती.

जुन्या भांडणातून हल्ला; शर्मा प्रकरणाशी संबंध नाही : पोलिस
ज्यांच्या बाबतीत ही घटना घडली त्यांच्यात यापूर्वीही भांडणे झाली होती. त्यासंबंधीचे गुन्हे कर्जत पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत. त्याच वादातून रात्रीचा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नूपुर शर्मा यांचे समर्थन करण्याशी याचा काही संबंध असल्याचे अद्याप तरी नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिस संपूर्ण चौकशी करीत आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...