आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO वायफायचा पासवर्ड न दिल्याने खून:17 वर्षीय तरुणावर दोघांचे चाकूने वार, बेदम मारहाणही केली

नवी मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट वापरण्यासाठी आपल्या मोबाईलच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड दिला नाही, या कारणावरुन नवी मुंबईत एका तरुणाचा दोघांनी चाकूने वार करत खून केला. नवी मुंबईत ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

आरोपींना अटक

तरुणावर चाकूने वार करण्यापूर्वी आरोपींनी तरुणाला बेदम मारहाणही केली. आरोपींनी नवी मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुण बेकरीत कामाला

घटनेबाबत नवी मुंबई पोलिसांनी माहिती दिली की, कामोठे परिसरात 27 ऑक्टोबररोजी ही घटना घडली. राजकुमार मौर्य असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे आहे. तो कामोठे येथील एका बेकरीमध्ये काम करायचा.

नेमके काय घडले?

27 ऑक्टोबरच्या रात्री विशाल काम आटोपून घरी परतत होता. वाटेत एका टपरीजवळ त्याला आरोपी रवींद्र हरयाणी आणि राज भेटले. आरोपींनी विशालला हॉटस्पॉटचा पासवर्ड विचारला. विशालने नकार दिल्याने दोन्ही आरोपींनी प्रथम विशालला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने विशालच्या पाठीवर चाकूने वार करून दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. नंतर रुग्णालयात दाखल केले असता विशालचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कामोठे पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...