आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहातउसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने २४ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी देवळा पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली. हर्षल संजय गायकवाड (२४, रा. विठेवाडी रोड, विद्यानगर, देवळा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव नाहे. याप्रकरणी मृताचे वडील संजय हरी गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून प्रवीण सदाशिव आहेर (रा. तिसगाव, ता. देवळा) आणि अमोल निकम (रा. दाभाडी, ता. मालेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
माहितीनुसार, हर्षलने प्रवीण व अमोलकडून २१ लाख रुपये हे हातउसने घेतले होते. त्यासाठी फिर्यादी संजय गायकवाड यांनी दोघांना तीन धनादेश दिलेले होते. सदरचे तिन्ही धनादेश फिर्यादीच्या खात्यावर पैसे नसल्याने बाउन्स झाले. त्यामुळे संशयित दोन्ही आरोपींनी पैशासाठी हर्षलच्या मागे तगादा लावला होता. त्याला धमक्या देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून हर्षलने घरात कोणी नसताना बेडरूममध्ये पडद्याच्या कपड्याने छताला गळफास घेत आपले जीवन संपवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.