आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यात मानोली येथे युवक व शेतकऱ्याने अात्महत्या केल्याची घटना घडली. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात बोरदहेगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून ४२ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. मानव तालुक्यात मानोली येथे रवी सखाराम काकडे (२१) या युवकाने (१४ डिसेंबरला) शेतात झाडाला गळफास आत्महत्या केली. रवी काकडे याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून त्याचे वडील सखाराम काकडे हे मजुरी करतात. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. याच गावातील ज्ञानोबा ग्यानदेवराव भांड (५२) यांनी शेतात गळफास घेतला.
ही घटना १५ रोजी उघडकीस आली. त्यांना ३ एकर शेती असून ते शेतात मजुरी करून उपजीविका चालवत होते. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तिसऱ्या घटनेत वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव येथील शेतकरी रमेश भानुदास उगले (४२) यांनी गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी व मुले शेतात रोजंदारी गेले असता त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. रमेश हे अल्पभूधारक होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून व सततच्या नापिकीला त्रस्त होऊन रमेश यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे ग्रामस्थ व शेजाऱ्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.