आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

परीक्षा:'देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांसाठी युवासेना खंबीरपणे उभी राहणार', अंतिम वर्षाच्या परीक्षेविषयी युवासेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, रिट याचिका दाखल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूजीसीने जाहीर केलेली 31 मार्गदर्शक तत्त्व अंमलबजावणीसाठी व्यावहारिक नसल्याचे म्हणत युवासेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, रिट याचिका दाखल

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा कहर राज्यभरात पाहायला मिळतोय. याच काळात अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन वाद सुरू आहे. परीक्षा घेऊ नये यावर राज्य सरकार ठाम असले तरीही यूजीसीने सप्टेंबरपासून परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांसाठी युवासेना खंबीरपणे उभी राहणार असल्याचे म्हणत अंतिम वर्षाच्या परीक्षेद्दल आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत.

युवासेनेने याबाब थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देशातील विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी शिवसेना नेते व मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने यूजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात  सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असल्याची माहिती युवासेनेचे सचिव वरुन सरदेसाई यांनी दिली आहे. 

यूजीसीने जाहीर केलेली 31 मार्गदर्शक तत्त्व अंमलबजावणीसाठी व्यावहारिक नाही

'भारत देशातील कोविड रुग्णांची एकूण संख्या दहा लाखांचा आकडा पार करत आहे. देश कोविड संक्रमणात जगात तिसऱ्या नंबरवर आहे.अशा चिंताजनक परिस्थिती देखील देशभरातील विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य, चिंता आणि सुरक्षितता याचा कुठलाही विचार न करता भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे मंत्री व विद्यापीठ अनुदान आयोग यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठींनी मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करुन सप्टेंबर महिन्यात घ्याव्यातअसे जाहीर केले आहे. या परीक्षा घेण्यासाठी यूजीसीने जाहीर केलेली 31 मार्गदर्शक तत्त्व अंमलबजावणीसाठी व्यावहारिक नाही.' असे म्हणत शिवसेनेने या निर्णयाचा विरोध केला आहे.