आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन खरेदी भोवली:झेप्टो डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग; इन्स्टाग्राम पोस्टवरून मुंबई पोलिसांच्या बेड्या

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झेप्टो डिलिव्हरी बॉयने मुंबईत घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. खारच्या उपनगर भागात तीस नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर संशयित आरोपी शहजादे शेखला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

'झेप्टो'वरून किराणा सामानाची ऑनलाइन खरेदी करता येते. कमीत कमी वेळेत आम्ही सामान पाहोचवू, असा दावा कंपनी करते. मात्र, अशा प्रकरणातही महिलांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे समोर येत आहे.

व्हिडिओ रेकॉर्डिंग केले...

सबीना नावाची एक महिला मुंबईतल्या खार परिसरात राहते. तिने आपल्यासोबत घडलेल्या या प्रसंगाची आपबिती इन्स्ट्राग्रामवरून मांडली. तेव्हा हा सारा प्रकार समोर आला. सबीनाने त्या तरुणाचा फोटोही पोस्ट केला आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, मी 30 नोव्हेंबर रोजी किराणा सामानाची ऑर्डर दिली. ही ऑर्डर घेऊन दुपारी 3:10 वाजता शाहजादे शेख नावाचा तरुण दारात आला. मी त्याला गुगल पेवरून पैसे पाठवत होते. तेव्हा त्याने माझे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली. मी त्याला जाब विचारला असता, त्याने हसणे सुरू केले. मी त्याला त्याचा फोन मागितला. मात्र, त्याने दिला नाही. मी त्याच्याजवळचा फोन घेऊन व्हिडिओ डिलिट करण्याचा प्रयत्न केला. तो व्हिडओ डिलिट कर, नाही तर सुरक्षारक्षकाला फोन करण्याची धमकी दिली.

तो माझ्याकडे झेपावला

मात्र, त्याने व्हिडिओ डिलिट केला नाहीच. उलट मी घरात एकटी असल्याचे पाहून तो आत घुसला. मला धुक्काबुक्की करायला सुरुवात केली. माझा हात धरला. माझ्याशी गैरवर्तन, शिवीगाळ केली. मला प्रचंड भीती वाटली. त्यामुळे मी धावत स्वयंपाक घरात शिरले. तिथूनच सिक्युरिटी गार्डला फोन केला. तो माझ्याकडेच येत होता. शेवटी सिक्युरिडी गार्ड आला. त्याने त्याला थांबायला भाग पाडले आणि त्याच्याजवळचा फोन घेऊन मला दिला. त्याच्या मोबाइलमध्ये माझा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ होता.

गार्ड आला नसता तर...

सिक्युरिटी गार्डने मला वाचवले. थोडक्यात माझ्या स्वतःच्या घरातही मी सुरक्षित नाही. आता मी कुठल्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कसा विश्वास ठेवणार? @zeptonow तुम्ही अशीच ग्राहक सेवा देता का? तुमच्या सेवेमुळे किती महिलांना असा त्रास होतो, याची मला माहिती नाही. मात्र, या सगळ्या प्रकाराला @zeptonow जबाबदार आहे. तुमच्याकडून ऑनलाइन किराणा सामानाची खरेदी करणे महिलांसाठी धोक्याचे आहे, अशी आपबीती सबीना यांनी पोस्ट केलीय. त्यानंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉय शहजादे शेखला बेड्या ठोकून तपास सुरू केलाय.

बातम्या आणखी आहेत...