आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPO ची धूम सुरू:पहिल्याच दिवशी झोमॅटो आयपीओला चांगला प्रतिसाद, इश्यू 1.05 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 2.69 पट भरला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या दिवशी IPO 1.05 पटींनी सब्सक्राइब झाले

ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा पब्लिक इश्यू (IPO) आजपासून उघडला आहे. 16 जुलैपर्यंत गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करु शकतात. कंपनीने 195 शेअर्सचे लॉट साइज निश्चित केले आहेत. एका लॉटची बोली लावण्यासाठी 14,820 रुपए गुंतवणूक करावी लागेल. कारण प्रति शेअर 72-76 रुपये प्राइस बँड ठरवण्यात आला आहे.

पहिल्या दिवशी IPO 1.05 पटींनी सब्सक्राइब झाले
एक्सचेंज डेटानुसार झोमॅटोचा पब्लिक इश्यू पहिल्या दिवशी 1.05 टक्के भरला. कंपनी द्वारे जारी 71.92 कोटी शेअर्सच्या तुलनेत 75.60 कोटी शेअरवर बोली मिळाली. IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी रिझर्व्ह वाटा 2.69 पटींनी भरला. या व्यतिरिक्त पात्र संस्थांच्या खरेदीदारांचा वाटा 98% आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा फक्त 13% आहे. त्याच वेळी कर्मचार्‍यांसाठी राखीव हिस्सा 18% भरला आहे.

आयपीओच्या माध्यमातून कंपनी 9,375 कोटी रुपये जमा करेल
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) फाइलिंग नुसार कंपनी आयपीओच्या माध्यमातून 9,375 कोटी रुपये जमा करेल. आयपीओनंतर शेअर्सचे वाटप 26 जुलै रोजी होईल आणि 27 जुलैला बीएसई आणि एनएसईवर शेअरची लिस्टिंग होईल.

काय म्हणतात ब्रोकरेज हाउस?
IIFL

आयआयएफएलच्या मते, झोमॅटो कमाईच्या 5 पट वाढीसह नफा आणि व्हॅल्यू क्रिएशनच्या मार्गावर पोहोचणार आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 15% ऑपरेटिंग नफा होईल. या आधारे गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयआयएफएलचा असा विश्वास आहे की झोमॅटो डीसीएफ विश्लेषणाच्या आधारे सुमारे 10 बिलियन डॉलर्सच्या मूल्यांकनावर व्यवसाय करू शकते.

ICICI सिक्योरिटीज
झोमॅटोला अजून ग्रोथ करायची आहे. खरेतर, हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोरदार ग्रोथ दाखवत आहे. झोमॅटो तांत्रिक पायाभूत सुविधा स्वीकारत आहे. डेमोग्राफिक प्रोफाइल आणि तांत्रिक पायाभूत सुविधा बदलण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज
सध्या, पुढील काही वर्षांसाठी झोमॅटोच्या वाढीचा अंदाज बांधणे थोडे अवघड आहे. जास्त जोखीम घेणारे गुंतवणूकदार लिस्टिंगदरम्यान चांगल्या परताव्यासाठी पैसा लावू शकतात.

व्हेंचुरा सिक्युरिटीज
व्हेंचुरा सिक्युरिटीजने या प्रकरणाची सदस्यता घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यात म्हटले आहे की देशात वेगाने स्मार्टफोन वाढत आहेत आणि लोकांची जीवनशैली अशी आहे की त्यांना ऑनलाईन ऑर्डर देण्यास रस आहे. अशा परिस्थितीत, आर्थिक वर्ष 2024 पर्यंत झोमॅटोचे उत्पन्न 1,994 कोटी (FY21) ने वाढून 8,910 कोटी रुपयांवर जाईल. या आयपीओमुळे झोमाटोची रोख पातळी वाढून 15,000 कोटी होईल.

इकॉनॉमिक्स रिसर्च अँड अॅडव्हायजरी
इकॉनॉमिक्स रिसर्च अँड अॅडव्हायजरीने गुंतवणूकदारांना आयपीओपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. अॅडव्हायजरीने म्हटले आहे की झोमॅटोला योग्य नफा मिळवण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

किती शेअर्ससाठी अप्लाय करावे लागेल?
195 शेअर्ससाठी किंवा याच्या अनेक पटींनी तुम्ही अप्लाय करु शकता. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अप्लाय करू शकतात. सेबीच्या नियमांनुसार आपण 2 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही.

अलॉटमेंटचे स्टेट कुठे कळेल?
तुम्ही यासाठी लिंकटाइम इंडिया किंवा कंपनीची वेबसाइट किंवा स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवरन माहिती घेऊ शकता.

शेअर्सची लिस्टिंग कधी होईल?
26 जुलैला शेअरचे अलॉटमेंट होईल. 27 जुलैला BSE आणि NSE वर लिस्टिंग होईल.

बातम्या आणखी आहेत...