आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेगाभरती:जि. प. आरोग्य विभागात 13,514 पदांची मेगाभरती; मराठा उमेदवारांना खुल्या किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज सादर करावा लागणार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मार्च 2019 जाहिरातीनुसार भरती

राज्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव व इतर साथरोगाची शक्यता लक्षात घेता ग्रामीण भागातील जनतेला तत्काळ आरोग्यसेवा मिळावी म्हणून क वर्गातील विविध ५ संवर्गांतील १३ हजार ५१४ जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीत मराठा (एसईबीसी) उमेदवारांना खुल्या किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून नव्याने अर्ज व शुल्क दाखल करावे लागणार आहे. मेगाभरती २०१९ अंतर्गत मार्च २०१९ मध्ये महापरीक्षा पोर्टलअंतर्गत जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गट क्रमांकामधील १८ संवर्गापैकी आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक पुरुष, आरोग्यसेविका या ५ वर्गांसाठी जाहिरातीत नमूद सर्व रिक्त पदांच्या भरतीस शासनाने मान्यता दिली आहे.

तसेच भरतीत यापूर्वी दिलेल्या ३% दिव्यांग आरक्षणाबद्दल बदल करून ४% प्रमाणे आरक्षण निश्चित करून घ्यावे. दिव्यांगांसाठी उपलब्ध होणाऱ्या पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. भरतीत एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास) प्रवर्गासाठी आरक्षण ठेवून जाहिरात प्रसिद्ध केली असल्यास अशा प्रकरणी एसईबीसी प्रवर्गाकरिता राखीव असलेली पदे खुल्या प्रवर्गात रूपांतरित करण्याबाबत सामान्य प्रशासनाने मान्यता दिलेली आहे.

मार्च २०१९ जाहिरातीनुसार भरती
मार्च २०१९ मधील जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेले उमेदवार वगळून इतर प्रवर्गातील उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र राहतील. एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस वा खुल्या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. तसेच एका उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांसाठी अर्ज करण्याची तसेच एका उमेदवाराला एका किंवा अनेक संवर्गातील पदासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...