आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:जि.प., पं.स. पोटनिवडणुकीत सरासरी 63 टक्के मतदान; आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांतील ८४ तर त्याअंतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६३ टक्के मतदान झाले. सर्व ठिकाणी बुधवार, (ता.६ ) सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या ६ जिल्हा परिषदेच्या ८५ निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या १४४ निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांसाठी मंगळवारी मतदान झाले.

मतदानाची टक्केवारी
धुळे - ६०
नंदुरबार - ६५
अकोला - ६३
वाशीम - ६५
नागपूर - ६०
पालघर - ६५

बातम्या आणखी आहेत...