आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 लाखांची आर्थिक मदत:आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मुग्धा आग्रेला वेकोलीच्यावतीने सहाय्य

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मुग्धा आग्रेला कोल इंडियाची उपकंपनी वेकोलीतर्फे १० लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. कुमारी मुग्धा ही बॅडमिंटनची आंतरराष्ट्रीय खेळाडू असून तिने अनेक स्पर्धांमध्ये आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.

जेई विल्सन इंटरनॅशनल सिरीज २०१९ मधील रौप्य पदक, नायजेरियातील लागोस इंटरनॅशनल चॅलेंज २०१७ मधील रौप्य पदक, योनेक्स सनराईज बांगलादेश इंटरनॅशनल चॅलेंज २०१८ मधील कांस्य पदक आणि टाटा ओपन इंटरनॅशनल चॅलेंज २०१८ मध्ये कांस्य पदक मुग्धाने पटकावले आहे. मुग्धाची जागतिक स्तरावर आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट रँकिंग ५९ आहे. राष्ट्रीय स्तरावर रँकिंग १२ आहे.

आज वेकेलीचे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार यांनी कुमारी मुग्धा यांना वेकोली मुख्यालयात १० लाख रुपयांचा धनादेश दिला. त्यांच्यासोबत संचालक (कार्मिक) डॉ. संजय कुमार, संचालक तांत्रिक (नियोजन व प्रकल्प) ए. के. सिंग आणि कल्याण आणि सीएसआर विभागाचे प्रमुख ए. एन. वर्मा उपस्थित होते. सर्वांनी कुमारी मुग्धाला शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...