आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात दहा ते बारा ह्युमन मिल्क बँक:आईच्या दुधांना पारख्या झालेल्या बाळांना मिळाले नवजीवन; बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न

नागपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

1 ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तरावर स्तनदा सप्ताह म्हणून साजरा होतो. 32 वर्षांपूर्वी 1989साली भारतातील पहिली माता दूध पेढी मुंबईतील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज, सायन मुंबई (LTMGH) येथे सुरू झाली. त्या नंतर महाराष्ट्रात आता सुमारे दहा ते पंधरा माता दुग्ध पेढ्या कार्यरत आहे. यामुळे आईच्या दुधांना पारख्या झालेल्या बाळांना नवजीवन मिळाले आहे. सध्या देशात सुमारे 90 आणि महाराष्ट्रात दहा ते पंधरा दुग्ध पेढ्या सुरू असल्याची माहिती सायन हाॅस्पीटलच्या निओनॅटोलॉजी आणि ह्युमन मिल्क बँकेच्या प्रमुख डॉ. स्वाती माणेरकर यांनी दिली. सध्या देशभरात सुमारे 90 आणि महाराष्ट्रात 10 ते 15 ह्युमन मिल्क बँक असल्याची माहिती माणेरकर यांनी दिली.

जन्मानंतर लगेचच नवजात शिशुला आईचे पिवळे कंडेन्स्ड दूध पाजणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु काही वेळा आईचे दूध तयार न झाल्याने किंवा कोणत्याही वैद्यकीय समस्येमुळे आई दूध देत नाही. अशा परिस्थितीत ह्युमन मिल्क बँक मुलांसाठी वरदान ठरत असल्याचे माणेरकर यांनी सांगितले. आईने बाळाला अंगावर पाजलेच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

असे होते संकलन

एड्स, कावीळ, इतर संसर्गजन्य रोग नसलेल्या निरोगी मातांचे अतिरिक्त दूध (सरप्लस मिल्क) पेढीसाठी घेतले जाते. इलेक्ट्रॉनिक ब्रेस्ट पंपच्या साह्याने दूध काढले जाते. वेदनारहित आणि सुरक्षित पद्धतीने काढलेल्या या दुधाला संसर्गाचा धोका असतो. पाश्चरायझर मशीनमध्ये मातेचे दूध संकलित केले जाते. 62.5 डिग्री सेल्सिअस अंशाला तापवून हे दूध साठवले जाते. यामुळे दुधातील प्रोटीन व इतर जीवनसत्त्वे सुरक्षित राहतात. दूध तापवल्यानंतर त्यात अपायकारक जिवाणू व इतर जंतू असू नयेत या खबरदारीसाठी हे दूध सूक्ष्मजीवशास्त्र विभागातून तपासून घेतात. फ्रीजमध्ये संकलित केलेल्या दुधाचा पुरेपूर लाभ मिळण्यासाठी काढल्यापासून 96 तासांत बाळाला मिळणे गरजेचे असते. तसेच उणे वीस तापमानाला सहा महिन्यांपर्यंत हे दूध साठवता येते.

बालमृत्यू रोखणे शक्य

भारतात दर हजार नवजात बाळांपैकी 43 बाळांचा मृत्यू जन्मानंतरच्या पहिल्या महिन्यात होतो, तर जन्मल्यानंतर मृत्यू पावणा-या बालकांची संख्या हजारामागे 47 इतकी आहे. हे मृत्यू कमी करण्यासाठी मानवी दूधपेढ्या उपयोगी ठरणार आहेत. यामुळे बालमृत्यू रोखणे शक्य होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...