आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:महिला क्लर्ककडून ११ लाखांची अफरातफर

प्रतिनिधी | नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पालक आणि विद्यार्थ्यांनी दिलेली ११ लाख १३ हजार १७० रूपये शुल्क शाळेत जमा न करता परस्पर अफरातफर करणाऱ्या शाळेच्या क्लर्क विरोधात वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फरार क्लर्कचा शोध घेण्यात येत आहे. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमरेड रोड येथे एस. पी. पब्लिक स्कूल आहे. या शाळेमध्ये स्नेहा प्रवीण अंबर्ते उर्फ स्नेहा मारोतीराव खराते (वय ३४, वृंदावन नगर) ही कॅशियर व क्लर्क म्हणून काम करते. तिने पालकांनी जमा केलेले शुल्काची अफरातफर केली.