आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक फसवणूक:पासवर्ड हॅकिंगमुळे दोन वर्षांमध्ये नागपुरात 110 जणांची फसवणूक, दोन कोटी 80 लाख रुपयांपैकी रिकव्हर झाले पाच लाख 80 हजार

नागपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाईलवर आलेला ओटीपी तसेच फेक अकाऊंटमुळे नागपूर शहरात २०२० आणि २०२१ या दोन वर्षात २ कोटी ८० लाखांची फसवणूक झाली. परंतु प्रत्यक्षात त्यातील ५ लाख ८० हजाराची रिकव्हरी झाली. आपल्या मोबाइलवर अनेकदा ओटीपी येतो. त्यात काही माहिती मागितली जाते. ती दिल्यामुळे फसवणूक होते. तर अनेकदा फेक अकाऊंटमुळे आर्थिकदृष्ट्या लुटले जाते.

२०२० मध्ये ओटीपीमुळे आर्थिक फसवणूक झाल्याची २१० प्रकरणे झाली. तर पासवर्ड हॅकिंगमुळे ७० जणांची फसवणूक झाली. यात एकूण १ कोटी ६० लाखांनी फसवणूक झाली. तर रिकव्हर मात्र २ लाख ६५ हजार रूपये झाले. तसेच २०२१ मध्ये ओटीपीमुळे आर्थिक फसवणूक झाल्याची २९० प्रकरणे झाली. तर पासवर्ड हॅकिंगमुळे ४० जणांची फसवणूक झाली. यात १ कोटी ३७ लाखांची फसवणूक झाली. तर ३ लाख १५ हजार रिकव्हर होऊ शकले.

फसवणूक होऊ नये म्हणून मजबूत आणि सुरक्षित पासवर्ड असणे महत्वाचे आहे. विशेषत: आता बहुतांश काम आॅनलाईन होेते. आणि बँकांचे व्यवहार डिजिटली होतात. आपल्या पासवर्डचा कोणीही अंदाज लावू शकणार नाही, असे समजण्यात स्वत:ची फसवणूक आहे. कारण व्यावसायीक हॅकर्स काही सेकंदात त्यांचा अंदाज लावू शकतात! आपला पासवर्ड काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी एकदा बदलला पाहिजे. आॅनलाइन अकाऊंटचे व्हेरिफिकेशन गरजेचे ः आॅनलाईन अकाऊंटचे व्हेरिफिकेशन होत नसल्यामुळे सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेतात. ते असे अकाऊंट दोन ते तीन महिने वापरून बंद करतात, अशी माहिती नागपूर सायबर सेलचे पोलिस निरीक्षक संजय पंडागळे यांनी दिली. आज कोणताही माणूस कुठेही आॅनलाईन अकाऊंट सुरू करू शकतो. तेव्हा बँकांनी त्याचे व्हेरिफिकेशन करण्यासोबतच याबाबत नियमावली करणे गरजेचे आहे. या सोबतच सिमकार्ड देताना मोबाईल कंपन्या तसेच एजंटांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आपली गोपनीय माहिती कणाच्या हाती लागणार नाही याबाबत प्रत्येकाने दक्ष राहाणे आवश्यक आहे. कारण अनेकदा तपासात सिमकार्ड दुसऱ्याचे सिमकार्ड तिसऱ्याच कुणाच्या नावावर असल्याची उदाहरणे आहे, असे पंडागळे यांनी सांगितले.

पासवर्ड वारंवार बदला
दुर्दैवाने, जोखीम माहित असूनही बऱ्याच लोकांना त्यांचे पासवर्ड वारंवार बदलण्याची सवय नसते. तुमचे ईमेल, सोशल मीडिया अकाऊंट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती साठवणाऱ्या खात्यांचे पासवर्ड वरचेवर बदलत राहिले पाहिजे. - अॅड. महेंद्र लिमये, सायबर तज्ज्ञ
फेक अकाऊंट, ओटीपीच्या माध्यमातून होते फसवणूक

बातम्या आणखी आहेत...