आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराताडोबासह गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर व पातानील येथील एकूण १३ हत्ती गुजरातमधील जामनगर येथे पाठवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याची माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) युवराज एस. यांनी दिली.
कमलापूर येथील चार सुदृढ हत्तीशिवाय कमलापूर, पातानील व ताडोबा येथील वयोवृद्ध, अप्रशिक्षित व लहान पिल्ले अशा एकूण १३ हत्तींच्या पुढील जीवनकाळातील योग्य स्वास्थ व उच्च दर्जाच्या वैद्यकीय देखरेखीसाठी, प्रशिक्षित व अनुभवी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत उपचाराची सोय व उत्तम आधुनिक सेवा सुनिश्चित करण्यासाठी, राहण्यासाठी प्रशस्त व भरपूर जागा असलेल्या गुजरातमधील जामनगरस्थित राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट येथे पाठवण्यात येणार आहे. त्यांना यापुढे कोणतेही काम देण्यात येणार नाही किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा वापर करण्यात येणार नाही. तसेच प्राणिसंग्रहालयाप्रमाणे कोठेही प्रदर्शितही करण्यात येणार नाही. वन विभागाने हे हत्ती राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट, जामनगर येथे पाठवण्यासाठी केंद्र शासनाकडून नियमानुसार ना-हरकत पत्र प्राप्त केले आहे. या सर्व हत्तींची आजन्म काळजी ट्रस्टकडून घेण्यात येणार असल्याचे वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन-वन्यजीव) तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) युवराज एस. यांनी कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.