आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:राज्यातील तुरुंगात 13 हजार अधिक कैदी

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरातील तुडुंब भरलेल्या तुरुंगांत जवळपास १३ हजार कैदी क्षमतेपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. मध्यवर्ती कारागृहे व जिल्हा कारागृहांमध्ये दुपटीपेक्षा अधिक कैदी संख्या आहे. यात ७५ टक्के न्यायाधीन (कच्चे), तर २५ टक्के सिद्धदोष (शिक्षा) कैदी आहेत.

महाराष्ट्र कारागृह विभागात ९ मध्यवर्ती कारागृहे, २८ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे, १ खुली वसाहत आणि १७२ दुय्यम कारागृहांचा समावेश होतो. पुणे आणि मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे. पुणे व अकोला येथे महिलांसाठी खुले कारागृह आहेत. राज्यातील साठ कारागृहातील कैद्यांची अधिकृत कैद्यांची संख्या २४ हजार ७२२ इतकी आहे. प्रत्यक्ष कैदी संख्या ३७८५० आहे. यामध्ये सिद्धदोष कैद्यांची संख्या ५००८ व न्यायाधीन कैद्यांची संख्या ३२५५९ आहे. २८३ कैदी स्थानबद्ध आहेत. कैद्यांची वाढती संख्या ही कारागृह प्रशासनाच्या समोर डोकेदुखी होत चालली आहे. तात्पुरती उपाययोजना करून बराकींमध्ये कैद्यांना ठेवले जाते, पण एकाच ठिकाणी गर्दी होत असल्याने व्यवस्थापन करणे कठीण झाले आहे. अनेक दिवसांपासून त्यावर तोडगा निघाला नाही.

या संदर्भात अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. -

बातम्या आणखी आहेत...