आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कारागृहातही कोरोना:नागपूर कारागृहातील 132 कैद्यांना काेरोनाची लागण झाल्याने खळबळ

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पॅरोलवर सोडललेल्या साडेसातशे कैद्यानंतरही कारागृहात सुमारे अठराशे कैदी

नागपूर मध्यवर्ती कारागृहातही कोरोना पोहोचला असून सुमारे १३२ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ माजली आहे. यापूर्वी मध्यवर्ती कारागृहात सुमारे ५४ अधिकारी कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. या शिवाय ३० कैदी कोरोनाबाधित आढळले होते. त्यामुळे ही संख्या ८४ झाली होती. मात्र, गुरुवारी एकाच दिवशी १३२ कैदी कोरोनाबाधित झाल्याने खळबळ माजली आहे. कोरोनाबाधित कैद्यांची संख्या वाढल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारागृहाला भेट देऊन काळजी घेण्याचे निर्देश दिले होते.

सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सोडललेल्या साडेसातशे कैद्यानंतरही कारागृहात सुमारे अठराशे कैदी आहेत. याच कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दोन पथके प्रत्येकी पंधरा दिवस कारागृहाच्या आत आणि पुढील पंधरा दिवस क्वॉरंटाइन अशा स्वरूपात काम करत आहे. ११ जून ते २६ जून दरम्यान तुरुंग प्रशासनातील एक कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर ३० जून रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एक अधिकारी आणि आठ कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ माजली होती. दरम्यान, पहिल्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्याला कारागृहात असतानाच त्याला ताप आला होता. नंतर त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यातून कारागृहाच्या आतील कैद्यांनाही संक्रमण झाले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

0