आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:उपराजधानीत रविवारी 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; यातील आठ रुग्ण तबलिगी जमातीच्या बैठकीत सहभागी झालेले

नागपूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आयसोलेशन वॉर्डसाठी जामा मशिदीचा पुढाकार

उपराजधानी नागपुरात रविवारी तब्बल १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हादरून गेले आहे. यातील आठ रुग्ण तबलिगी जमातीच्या बैठकीत सहभागी झालेले होते. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. सर्व रुग्णांचा संपर्क शोधण्याचे काम प्रशासनाने युद्धस्तरावर हाती घेतले आहे.

महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नवे पॉझिटिव्ह आढळून आलेले सर्वच जण आमदार निवासात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चौदा रुग्णांपैकी ८ जणांचा संबंध दिल्ली येथील तबलिगी जमातीच्या बैठकीशी असल्याचे आढळून आले आहे, तर ४ जण जबलपूर येथील रहिवासी असून ते दिल्लीहून थेट नागपुरातच आले होते. २२ वर्षे वयाचा एक रुग्ण नागपूर ग्रामीणमधील कामठी येथील रहिवासी असून तो देवबंदची परीक्षा देऊन नागपुरात आला होता. चौकट..

आयसोलेशन वॉर्डसाठी जामा मशिदीचा पुढाकार

दरम्यान, आता आयसोलेशन वॉर्डांची गरज वाढणार असून नागपुरातील जामा मशिदीचा (मोठी मशीद) वापर करावा, अशी विनंती मशीद व्यवस्थापन समितीने जिल्हा प्रशासनाला भेटून केली आहे.

बातम्या आणखी आहेत...