आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:कॅनडातील मित्र असल्याचे भासवून 16 लाखांची फसवणूक

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडातील मित्र असल्याचे भासवून १६ लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी नागपुरातील यशोधरानगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. १६ ते १७ नोव्हेंबरदरम्यान उप्पलवाडीतील मनिंदरसिंग जब्बल (५२) यांना फोन आला. आरोपीने स्वत:ला मनिंदरसिंग यांचा कॅनडातील मित्र बग्गासिंग असल्याचे भासवून मित्राची आजी आजरी असल्याने बँक खात्यावर १८ लाख ५० हजार रुपये पाठवण्याबाबत मेसेज करत वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. मनिंदरसिंग यांनी आरोपीने दिलेल्या बँक खात्यावर १६ लाख रुपये पाठवले.

बातम्या आणखी आहेत...