आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकृती धोक्याबाहेर:अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने 17 मुलांना विषबाधा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने बर्डी येथील मदन गोपाल हायस्कूलमधील १७ मुलांना विषबाधा झाल्याने लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलांवर ताबडतोब प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. हर्ष देशमुख यांनी दिली. सुरुवातीला या मुलांना उलट्या व मळमळल्यासारखे वाटत होते. परंतु आता सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे डाॅ. देशमुख यांनी सांगितले.या मुलांना शाळेच्या बाहेर एका अनोळखी व्यक्तीने चाॅकलेट वाटल्याचे समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...