आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुळे कारवाई:नागपूर, चंद्रपुरात 19 विदेशी तबलिगींवर गुन्हे; विदेश प्रवास, व्हिसा उल्लंघनाचा आरोप

नागपूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • धारावीत 5 तबलिगींना शोधून काढले

विदेश प्रवास आणि व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नागपूर आणि चंद्रपूरमध्ये एकूण १९ विदेशी तबलिगींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पर्यटक व्हिसावर हे लोक भारतात आले होते. ८ जणांवर नागपुरात तर ११ लोकांवर चंद्रपूरमध्ये गुन्हे दाखल झाले. नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी यास दुजोरा दिला. नागपुरातील हे लोक म्यानमारचे नागरिक असून त्यात ४ महिला व ४  पुरुषांचा समावेश आहे. तर, चंद्रपूरमध्ये गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये किर्गिजस्तान, कझाकिस्तान आणि रशियाच्या नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या सर्वांना नागपुरात विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

आरोप काय? 

विदेशातून पर्यटन व्हिसावर भारतात आलेल्या या लोकांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन करून धर्मप्रसाराच्या, उपदेशाच्या कामात सहभाग घेतला. त्यांचा मुक्कामही मशिदींमध्ये होता.

धारावीत ५ तबलिगींना शोधून काढले

मुंबई | धारावीत पोलिसांनी तबलिगीच्या ५ जणांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या ९ वर पोहोचली आहे. दिल्ली येथील मरकजमध्ये जे लोक सामील झाले होते, त्यांतील अजूनही सुमारे ५० जण मोबाइल बंद करून लपलेले आहेत.

मालेगावचे एकाचा मृत्यू 

येथील १५ संशयितांपैकी ५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एकाचा बुधवारी मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ६ वर गेला आहे. मृत्यू झालेला व्यक्ती हा हज यात्रेकरू होता. ३ मार्च रोजी तो शहरात परतला होता.

बातम्या आणखी आहेत...