आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील विविध बँकांच्या विरोधात 1.90 लाख तक्रारी:माहिती अधिकारात ‘आरबीआय’ने दिली माहिती

नागपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या कारणांनी बँकांविरोधात ग्राहकांच्या तक्रारी वाढत असल्याचे माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीतून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीत गेल्या वर्षभरात देशातील विविध बँकांविरोधात नागरिकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे १.९० लाखांच्या जवळपास तक्रारी केल्याचे स्पष्ट झाले. सर्वाधिक तक्रारी एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, पीएनबीविरोधात असल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे.

ग्रेटर बॉम्बे को- ऑपरेटिव्ह बँकेच्या विरोधात आरबीआयकडे २६६ तक्रारी, सारस्वत को- ऑपरेटिव्ह बँकेच्या विरोधात २३७, महाराष्ट्र ग्रामीण बँक ११२, कॉसमॉस सहकारी बँक ८२, अभ्युदय सहकारी बँक ७८, बॉम्बे मर्कंटाइल सहकारी बँक ५६, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ५५, ठाणे जनता सहकारी बँक ४२, नगर अर्बन सहकारी बँक २७, डोंबिवली नागरी सहकारी बँक २७, शंकरराव पुजारी नूतन नगरी सहकारी बँक इचलकरंजी २०, यवतमाळ अर्बन सहकारी बँक २०, मलकापूर अर्बन सहकारी बँक १८, नागपूर नागरिक सहकारी बँक १६, अकोला अर्बन सहकारी बँक १५, द महानगर सहकारी बँक मुंबई १२, जनता सहकारी बँक मालेगाव १२, मलकापूर अर्बन सहकारी बँक १२, जनता सहकारी बँक १२, द अकोला जनता कमर्शियल सहकारी बँक ११, शिक्षक सहकारी बँक ८ तक्रारी आहेत. धनादेश न वटणे, खातेधारकाला व्याज न मिळणे, एटीएममधून व्यवहार केला नसताना कपात, खात्यातील कपातीसह बँकांशी संबंधित तक्रारी करण्यात आल्या आहेत.

बँकेने न्याय न दिल्यास आरबीआयकडे तक्रार
बँकेच्या शाखेत न्याय न मिळाल्यास ही तक्रार बँकेच्या मुख्य शाखेकडे केली जाते. त्यानंतरही न्याय न मिळाल्यास भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लोकपालाकडे दाद मागता येते. आरबीआयच्या लोकपालाकडे देशभरातील विविध बँकांच्या विरोधात १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान १ लाख ८९ हजार ४८८ तक्रारी केल्याची माहिती देण्यात आली आहे. या तक्रारीवर आरबीआयकडून संबंधित बँकेला नोटीस बजावली जाते. तक्रारीवर काय कारवाई केली, हे बँकेला आरबीआयला कळवावे लागते.

बातम्या आणखी आहेत...