आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता वाढली!:पूर्व विदर्भात लम्पीमुळे 199 जनावरांचा मृत्यू; 90 प्रकरणांत दिली नुकसानभरपाई

नागपूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व विदर्भात लम्पीमुळे 199 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 90 प्रकरणांत नुकसानभरपाई देण्यात आली आहे. पूर्व विदर्भात एकूण 20 लाख 55 हजार 476 पशुधन आहे. विभागात एकूण 06 जिल्ह्यांत लम्पीची लागण झालेली आहे.

39 तालुक्यांतील 637 गावातील 4365 पशुधन बाधित झाल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली आहे. विभागात लसीकरणासाठी एकूण 20 लाख 25 हजार 600 लशी मिळाल्या असून 19 लाख 22 हजार 500 जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे.

लम्पी त्वचा रोगामुळे मृत्यू झालेल्या जनावरांना शासकीय परिपत्रकानुसार मदत दिली जाते. गाय आणि म्हैस मरण पावल्यास 30 हजार रूपये, बैल मरण पावल्यास 25 हजार आणि वासरू मरण पावल्यास 16 हजार रूपये मदत दिली जाते. आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात ‘लम्पी स्किन आजरा’मुळे आतापर्यंत 57 हजाराहून अधिक पशूंचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेला गती देण्यात आली आहे. देशात पशुपालन मोठ्या शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे. देशात अनेक राज्यांमध्ये लंपी स्कीनचा कहर वाढत चालला आहे. देशात 15 राज्यांत 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे.

लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो. यामुळे ताप येणे, त्वचेवर गाठी येणे अशी लक्षणे दिसून प्राण्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. यापूर्वी कोणतेही विषाणू संसर्ग न झालेल्या प्रणयनांना याचा सर्वाधिक धोका आहे. लम्पी त्वचा रोगाच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्त्राव, जास्त लाळ, पशूंच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये गुरांना खाण्यास त्रास होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

2019 मध्ये प्रथम भारतात या व्हायरसची लागण झाली होती. हा त्वचेचा रोग आहे, यामुळे जनावरांच्या शरिराला गाठी येतात आणि पुढे त्या गाठींचा आकार मोठी होतो. हा व्हायरस जास्त वेगाने दुसऱ्या जनावरांमध्ये संक्रमीत होतो असे सांगितले जात आहे, की हा आजार मच्छरा चावल्या मुळे होतो. लम्पी जागृतीसाठी आतापर्यंत 3508 कार्यक्रम घेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...