आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखुल्या मैदानात फुटबाॅल खेळणाऱ्या मुलांवर वीज पडून दोघे ठार झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. चनकापूर वेकोली वसाहत परिसरातील मैदानात सायंकाळी ५ वाजता वीज पडली. अनुज कुशवाह (२२), तन्मय सुनील दहिकर (१२) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सक्षम सुनील गोठीफोडे (१२) हा जखमी झाला. तिघेही मैदानात फुटबॉल, क्रिकेट आणि रनिंग करण्यासाठी आले होते. दुपारी ४ पासूनच आकाशात ढग आले हाेते. सव्वाचार वाजता पाऊस सुरू झाला. तेव्हा मैदानावरील मुले या मैदानालगत असलेल्या शेडकडे निवाऱ्यासाठी धावत सुटली.
सर्वात शेवटी मागे अनुज आणि फुटबॉल खेळाडू तन्मय आणि सक्षम राहिले. तिघेही धावत असताना त्यांच्यावर वीज पडली. यात अनुज आणि तन्मय यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर सक्षम याला उपचारार्थ नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनुज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. तन्मयच्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. तेव्हापासून तो आणि त्याची आई काकाकडे चनकापूर येथे राहत होते. सक्षम हा नागपूरला राहतो. पण आजीचे निधन झाल्यामुळे तो आजोबाकडे चनकापूर येथे आला होता.
वीज पडून १०० वर शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू
गडचिरोली | कोरचीपासून १२ किलोमीटर अंतरावर सावलीच्या जंगलात राजस्थानातील मेंढपाळांनी शेळ्या व मेंढ्यांचे कळप घेऊन डेरा टाकला असताना गुरुवारी रात्री वीज पडून १०० ते ११० शेळ्या व मेंढ्या ठार झाल्या. कोरची तालुक्यात दरवर्षी राजस्थान व गुजरात येथून हे मेंढपाळ शेळ्या व मेंढ्यांना चारण्यासाठी घेऊन येत असतात. या वर्षी त्यांचे दोन डेरे आहेत. यापैकी एक बेळगाव परिसरात व दुसरा सावली परिसरात होते. या दोन्ही डेऱ्यांत ७ ते ८ मेंढपाळांच्या कुटुंबांसह १२०० च्या जवळपास शेळ्या-मेंढ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.