आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ई-संवाद:अर्थव्यवस्था मजबुतीसाठी 20 लाख कोटींचे पॅकेज, आंत्रप्रेन्योर्स पदाधिकाऱ्यांना गडकरींचे मार्गदर्शन

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मासेमारी अर्थव्यवस्था 6 पट वाढवणार

कोरोनामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी व अर्थव्यवस्थेला गतीने चालना मिळून सर्वच क्षेत्रातील उद्योजक व व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा म्हणूनच केंद्र शासनाने २० लाख कोटींचे पॅकेज दिले असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. आंत्रप्रेन्योर्स असोसिएशन साऊथ एशिया पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते.

कोरोनाने संपूर्ण जग वेठीस धरले आहे. संपूर्ण जग कोरोनाचा सामना करीत आहे. कोरोनावर प्रतिबंधित लस शोधली जात नाही तोपर्यंत ही सर्व आव्हाने स्वीकारावी लागणार आहेत. यावर संशोधन सुरू आहे. लवकरात लवकर प्रतिबंधात्मक लस शोधली जाणार आहे. कोरोनामुळेच स्थलांतरित मजुरांचा प्रश्न निर्माण झाला. ग्रामीण उद्योग अर्थव्यवस्था ढासळली, व्यापार बंद आहे. या सर्वांसाठी हे २० लाख कोटींचे पॅकेज आहे. यातूनही सूक्ष्म, मध्यम व लघुउद्योगांसाठी ३ लाख कोटींचे पॅकेज दिले आहे. एमएसएमईने उद्योगांना भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून ५० हजार कोटी वेगळे काढून ़फंड्स ऑफ फंड्सच्या माध्यमातून उद्योगांना भांडवली बाजारातून भांडवल उभे करून देण्यास मदत करणार असल्याचे गडकरी म्हणाले.

एनबीएफसी, बँका यांना एमएसएमई व पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. तसेच या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसही परवानगी मिळाली आहे. देशात अद्ययावत तंत्रज्ञान आहे, तरुण कौशल्याधारित मनुष्यबळ आहे, मोठा बाजार आहे, अशा स्थितीत भारतात गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरणार आहे. उद्योगांना आपला उत्पादनाचा खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे.

मासेमारी अर्थव्यवस्था ६ पट वाढवणार

सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागात उद्योग आणि उद्योगांचा विकास झाला तर रोजगार निर्माण होतील व अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल. आयात कमी आणि भारतीय उत्पादनांची निर्यात अधिक करणे, मासेमारीची अर्थव्यवस्था ६ पटीने वाढवण्याची क्षमता आपल्या देशात आहे, असे गडकरी म्हणाले.