आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी मुख्यंमत्री सोशल मीडियावर ट्रोल:देवेंद्र फडणवीस यांचा 22 वर्षीय पुतण्या तन्मय फडणवीसने घेतली लस; काँग्रेसने उपस्थित केले 'हे' पाच प्रश्न; फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तन्मयने लसीकरणाचा हा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. परंतु, नंतर ट्रोल झाल्यावर डिलेट केला.

राज्यात सध्या लसीकरण सुरु झाले असून त्यांची वयोमर्यादा 45 वर्षे करण्यात आली आहे. परंतु, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन लस घेतल्याचा फोटो व्हायरल केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. काँग्रेसने यावर प्रश्न उपस्थित करत फडणवीस यांच्यावर टोला लगावला आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की, देशात सध्या लसीकरणाची वयोमर्यादा 45 असताना फडणवीस यांच्या पुतण्याने लस घेतलीच कशी? काय तो फ्रंटलाइन कामगार आहे का? यामुळे सोशल मीडियावर लोक माजी मुख्यमंत्र्यांना प्रचंड ट्रोल करत आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने उपस्थित केले हे पाच प्रश्न

  • तन्मयचे वय 45 वर्ष आहे का?
  • तो फ्रंटलाइन कामगार आहे का?
  • तो आरोग्य कर्मचारी आहे का?
  • जर यापैकी काहीच नसेल तर त्याला लस कशी मिळाली?
  • भाजपजवळ रेमडेसिवीरसारखे लसीचा पुरवठा आहे का?

तन्मयने स्वत: सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट तन्मय फडणवीस यांनी नागपूर येथील कॅन्सर इन्स्टीट्यूटमध्ये जाऊन लस घेतली. लस घेतल्यावर त्यांनी याचा फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेची झोड उठली. ट्रोलर 'चाचा विधायक है हमारे' अश्या कॅप्शनसह फोटो टाकत व्हीआयपी कल्चरवर प्रश्न उपस्थित करत आहे.

फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण - सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक
तन्मयच्या पोस्टनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, तन्मय हे माझे दूरचे नातेवाईक असून त्याने कसे लसीकरण केले हे मला माहित नाही. परंतु, त्याने जर नियमांचे उल्लंघन केले असेल तर ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले. सध्या माझ्या मुलीचे व पत्नीचेदेखील लसीकरण झाले नाही कारण ते त्यास पात्र नाही. माझे म्हणणे आहे की, नियम हे सर्वांना सारखे असायला हवे.

तन्मय (काळ्या सूट मध्ये) देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आणि माजी मंत्री शोभा फडणवीसांचा नातू आहे
तन्मय (काळ्या सूट मध्ये) देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आणि माजी मंत्री शोभा फडणवीसांचा नातू आहे

तन्मयने पहिला डोस मुंबई आणि दुसरा नागपूरमध्ये घेतला
नागपूर येथील कॅन्सर इन्स्टीट्यूटचे डायरेक्टर शैलेश जोगलेकर यांच्या मते, तन्मयने कोरोना लसीकरणाचा पहिला डोस मुंबई येथील सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये घेतला होता. तेथील सर्टीफिकेटच्या आधारावर आम्ही त्याला दुसरा डोस दिला. त्याने कोणत्या नियमांनुसार पहिला डोस घेतला हे आम्हाला माहित नसल्याचे ते म्हणाले.

तन्मयने स्वत: सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
तन्मय फडणवीस यांनी नागपूर येथील कँन्सर इन्स्टीट्यूटमध्ये जाऊन लस घेतली. लस घेतल्यावर त्यांनी याचा फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेची झोड उठली. लोक "काका आमचे आमदार आहेत" असे फोटो टाकत व्हीआयपी कल्चरवर प्रश्न उपस्थित करत आहे.

तन्मय आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतरचा आहे.
तन्मय आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतरचा आहे.
बातम्या आणखी आहेत...