आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ:23 विधेयके, 5 अध्यादेश अधिवेशनात सादर होणार

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथे सोमवारपासून (ता. १९) प्रारंभ होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एकूण २३ विधेयके आणि पटलावरती ठेवावयाचे ५ अध्यादेश सभागृहात मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये लोकपाल, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना उमेदवार म्हणून उभे राहता यावे तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या खाजगी विद्यापीठाच्या विधेयकाचादेखील समावेश आहे.

असे आहेत विधेयक

  • विधानसभा विधेयक - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक, २०२२ (सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ९ चे रूपांतर) (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या वाढविणेबाबत) (ग्रामविकास विभाग)
  • विधानसभा विधेयक - महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक, २०२२ ( सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ११ चे रूपांतर) (शेतकऱ्यांना निवडणूकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा) (कृषी विभाग).
  • सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक. मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ (सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक १२ चे रूपांतर) (इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास विभाग).

विधानसभा विधेयक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२२, (सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ९ चे रूपांतर) (विद्यापीठांचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुंरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद)

बातम्या आणखी आहेत...