आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:राज्यात २३ हजार पोलिसांना‘कमी जोखमी’च्या नेमणुका; पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची माहिती

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना दिलासा, ५५ वर्षांवरील पोलिसांना रजा

(रमाकांत दाणी)

कोरोनाशी लढा सुरू असताना राज्याच्या पोलिसांवर कामाचा ताण दिसू लागला आहे. त्यामुळेच आम्ही ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जवळपास १२ हजार कर्मचाऱ्यांना सुटीवर जाण्याची संधी दिली. आता ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या २३ हजार कर्मचाऱ्यांना कमी जोखमीच्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. ते कमीत कमी लोकांच्या संपर्कात यावेत म्हणून त्यांना पोलिस ठाण्यात कार्यालयीन काम दिले जात असल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

जयस्वाल म्हणाले, सध्या पोलिस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा लोकांशी फार संंपर्क येत नाही. त्यामुळे पन्नाशीपुढील कर्मचाऱ्यांकडे प्राधान्याने पोलिस ठाण्याची ड्यूटी सोपवली जात आहे. पोलिसांसाठी कोविड हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक युनिटचा कमांडर दैनंदिन त्याचे मॉनिटरिंग करतो. आजारी पोलिस कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी गरजेनुसार त्यांना एका शहरातून दुसरीकडे शिफ्ट करण्याची व्यवस्था राबवली जात असल्याचे जयस्वाल म्हणाले.

साइड ब्रँचही तैनात

बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी लोहमार्ग पोलिस दल, पोलिस प्रशिक्षण संस्था तसेच इतर साइड ब्रँचमधील एक हजारवर कर्मचाऱ्यांना तेथून बाहेर काढून जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

३५ वर्षांच्या करिअरमधील हे सर्वात मोठे आव्हान...

“माझ्या ३५ वर्षांच्या करिअरमधील हे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा संकटाच्या काळात सव्वादोन लाख कर्मचाऱ्यांच्या दलाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पोलिस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिवाचे रान करीत असताना जनतेकडून खूप मोठे सहकार्य मिळत आहे” - सुबोधकुमार जयस्वाल, पोलिस महासंचालक, महाराष्ट्र

> राज्यातील 1007 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला असून 4,899 पोलिस विलगीकरणात आहेत. तर 124 कर्मचारी कोरोनामुक्त झाले. 8 पोलिसांनी कोरोनामुळे प्राण गमावले.

बातम्या आणखी आहेत...