आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. भोंडेकर ​​​​​​​म्‍हणाले:प्रकल्पबाधित 26 गावांचे त्वरित पुनर्वसन करावे

भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोसीखुर्द जलाशयाच्या पूर्ण संचय पातळीमुळे बाधित होणाऱ्या अंशतः बाधित व पूर्णतः बाधित २६ गावांचे तत्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

गोसीखुर्द धरणाची पूर्ण संचय २४५ मीटर पातळीमुळे भंडारा, पवनी तालुक्यातील २६ गावे बाधित होतात. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची सर्वाधिक झळ या गावांना पोहोचली आहे. अंशतः बाधित गावांमध्ये मुजबी, दवडीपार, दाभा, गणेशपूर, भोजापूर, सालेबर्डी, कारधा, तिड्डी, कोरंभी देवी, बेला, कोथुर्णा, खैरी (बेटाळा), कवडसी, बेरोडी (टोला), करचखेडा, जमनी, लोहारा, भंडारा खास, पाहुनगाव, खमाटा, सूरबोडी व पेवठा गावांचा समावेश आहे. तर, पूर्णतः बाधित गावांमध्ये खमारी व खापा या गावांचा समावेश आहे. या सर्व २६ गावांमधील एकूण घरांची संख्या २८ हजार ४८४ असून ऐच्छिक पुनर्वसन करण्यात इच्छुक घरे ४ हजार ५६२ आहेत. या गावांच्या पुनर्वसनाची सातत्याने मागणी होत असून विदर्भ विकास महामंडळाने शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री, तसेच सचिव पातळीवर अनेकदा बैठकांचे आयोजन केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले. या २६ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत सतत पाठपुरावा करणार असल्याचे आमदार भोंडेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...