आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयावह!:नागपूर विभागात 10 महिन्यात 289 शेतकऱ्यांची आत्महत्या; 131 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित

नागपूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्राचा संकल्प केल्या नंतरही शेतकरी आत्महत्या थांबायचे नाव घेत नाही. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात नागपूर विभागात एकूण 289 शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. त्यापैकी 131 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याने शेतकरी कुटुंबीय मदतीपासून वंचित असल्याचे वास्तव समोर आले आहे.

शेतकरी आत्महत्त्येपैकी ​​​​​​मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या प्रकरणांची संख्या तुलनेने खूपच कमी असल्याचे दिसून आले आहे. नागपूर विभागात झालेल्या 289 आत्महत्त्येपैकी फक्त 95 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहे.

नागपूर जिल्ह्यातील 53 प्रकरणांपैकी 16 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. 7 अपात्र ठरली असून 30 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती अहवालात नमुद करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील 128 प्रकरणांपैकी 41 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. 36 अपात्र ठरली असून 51 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे.

भंडारा जिल्ह्यातील 20 प्रकरणांपैकी 06 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. 12 अपात्र ठरली असून 2 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे. गोंदिया जिल्ह्यातील 05 प्रकरणांपैकी 03 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. 2 अपात्र ठरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 83 प्रकरणांपैकी 29 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. 06 अपात्र ठरली असून 48 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे.

जानेवारी ते नोव्हेंबर 2021 या 11 महिन्यात राज्यात सुमारे 2,498 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. केलेली प्रत्येक मदत शेतकऱ्यांपर्यत पोहोचल्याचा अधिकाऱ्यांचा दावा यामुळे फोल ठरला आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेनंतरही राज्यात शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने पीक पद्धतीत बदल करण्याची मागणी समोर येत आहे.

सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीपासून विविध कर्जमाफी तसेच सवलत योजनांची अंमलबजावणी केली जाते. योजनेचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे दावे यंत्रणांकडून केले जातात. ते किती फोल आहेत हे या आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. 2020 मध्ये राज्यात 2,547 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भ हा शेतकरी आत्महत्यांसाठीच ओळखला जातो. त्यातही यवतमाळ 270 व अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 331 शेतकरी आत्महत्या झाल्या.

  • नागपूर विभाागतील शेतकरी आत्महत्त्यांची स्थिती (ऑक्टोबर 2022)

जिल्हा आत्महत्या

नागपूर - 53

वर्धा - 128

भंडारा - 20

गोंदीया - 05

चंद्रपूर - 83

गडचिरोली - 00

बातम्या आणखी आहेत...