आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

तिघांचा मृत्यू:विहिरीत पडलेल्या एका उंदिराला काढण्यासाठी एका शेतमजुराने घेतली उडी, नंतर दुसरा आणि तिसरा देखील उतरला, तिन्ही मजुरांचा मृत्यू

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विहिरीत विषारी वायू असल्याने गुदमरुन झाला मजुरांचा मृत्यू

विहिरीत पडलेला उंदीर बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या तीन शेतमजुरांचा विषारी वायूने गुदमरून मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील वाकेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. आकाश पंचबुद्धे (27 वर्षे), विनोद बर्वे (37 वर्षे) आणि गणेश काळबांडे (28 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. ऐन पोळ्याच्या पाडव्याला तीन कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनारायण सपाटे यांच्या शेतात शेतकामासाठी आकाश पंचबुद्धे, विनोद बर्वे आणि गणेश काळबांडे गेले होते. दुपारच्या सुमारास शेतातील विहिरीत उंदीर पडल्याचे एका मजुरास दिसले. त्याला काढण्यासाठी तो विहिरीत उतरला. मात्र आत गेलेला सहकारी बाहेर येत नसल्याने त्याला काढण्यासाठी दुसरा आणि नंतर तिसरा मजूर उतरला. मात्र विहिरीतील विषारी वायूने तिघांचा दुर्दैवी अंत झाला. विषारी वायू नाकातोंडात गेल्याने गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

गावात ही बातमी कळताच गावकरी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील विषारी वायूमुळे तिघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

0