आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरच्या कार्तिक जयस्वालचा गिनीज बुकात विक्रम:1 तासात मारले 3 हजार 351 पुशअप; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा मोडला रेकाॅर्ड

नागपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरातील कार्तीक जयस्वाल याने बुधवारी (ता. 15) एका तासात सर्वाधिक पुशअप मारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडून नवा विक्रम केला. विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात जागतिक विक्रम मोडण्याचे लक्ष्य 1 तासात 3 हजार 182 पुशअप्स होते. त्याने एका तासात मारले 3 हजार 351 पुशअप मारीत नवा विक्रम स्थापन केला.

यापूर्वीचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू डॅनियल स्कालीच्या नावावर आहे. डॅनियल स्काली हा ऑस्ट्रेलियन व्यावसायिक फिटनेस खेळाडू आहे आणि त्याच्याकडे दोन जागतिक विक्रम आहेत. कार्तिकने 1 तासात 3 हजार 182 पेक्षा जास्त पुशअप्स मारून नवा विक्रम केला आहे. कार्तिक जयस्वाल एमएमए फायटर, भारत आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर, फिटनेस प्लेयर आहे.

पुशअप्सचा नवा विक्रम करण्यासाठी तो गेल्या दोन वर्षांपासून सराव करीत होता. रवी मेंढे आणि मिश्र मार्शल आर्ट्स प्रशिक्षक युगांत उगले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिक इन्स्पायर जिममध्ये प्रशिक्षण घेत होता. विक्रमासाठी दिवसातील 6 तासांपेक्षा जास्त सराव करीत होता. याशिवाय आणि जागतिक विक्रम मोडण्यासाठी व त्याची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी 1 तास ध्यान करायचा. कार्तिकला विदर्भ क्रिएटर्स ग्रुपचे नेते सुनील हुड यांनी प्रायोजित केले होते.

बातम्या आणखी आहेत...