आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भाला 300 कोटींचा पीकविमा मिळाला:राज्यात 12 क्लटर्स मिळून 48 कोटी 82 लाख दावे दाखल

नागपूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भातील 11 जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाई पोटी 300 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा आघाडीचे अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना पाठवलेल्या माहितीत मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात 12 क्लटर्स मिळून 48 कोटी 82 लाख दावे दाखल झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खरीप 2022 हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एकूण 2,35,751 प्राप्त प्रकरणांपैकी 2,24,489 प्रकरणांs सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 11,262 प्रकरणांचे सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे. सर्वेक्षण पूर्ण झालेल्या प्रकरणांपैकी 1,56,056 प्रकरणांसाठी 103 कोटी 73 लाख नुकसानभरपाई रक्कम विमा कंपनी कडून निश्चित झाली आहे. अद्याप 45,841 प्रकरणांची नुकसान भरपाई निश्चित होणे बाकी आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 9625 प्राप्त प्रकरणांपैकी सर्व 9625 प्रकरणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण पूर्ण झालेल्या प्रकरणांसाठी 4 कोटी 35 लाख 90 हजार नुकसानभरपाई निश्चित झाली असून एकूण 4459 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर 1851 शेतकऱ्यांचे क्लेम कॅलक्युलेशनकरीता प्रलंबित आहे. गोंदिया जिल्ह्यात 900 प्राप्त प्रकरणांपैकी सर्व प्रकरणांची अजून छाननी सुरू आहे. छाननी पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येईल.

भंडारा जिल्ह्यात जिल्ह्यात 4934 ऑनलाईन आणि 11 ऑफलाईन असे एकूण 4945 अर्ज प्राप्त झाले. या प्रकरणांपैकी 544 प्रकरणांत नुकसानभरपाई किती द्यायची याचे कॅलक्युलेशन सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 950 अर्ज ऑनलाईन आणि 729 ऑफलाईन असे 1 लाख 65 हजार 679 अर्ज आले. त्यासाठी 53 कोटी 81 लाख 600 रूपयांची नुकसानभरपाई निश्चित केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 3 लाख 94 हजार 660 अर्ज आलेे. त्यापैकी 3 लाख 67 हजार 728 प्रकरणांत सर्व्हेक्षण पूर्ण झाले. 26,932 प्रकरणांत सर्व्हे सुरू आहे. सर्व्हेक्षण पूर्ण झालेल्या 3 लाख 67 हजार 728 प्रकरणांत 1 कोटी 61 लाख 28 हजार 24 रूपये नुकसानभरपाई निश्चित झाली आहे. अमरावती जिल्ह्यात 1,10,097 अर्ज ऑनलाईन आणि 5314 ऑफलाईन असे एकूण 1 लाख 15 हजार 411 अर्ज आलेे. त्यापैकी 1 लाख 01 हजार 084 प्रकरणांत सर्व्हेक्षण पूर्ण झाले. 14,327 प्रकरणांत सर्व्हे सुरू आहे. सर्व्हेक्षण पूर्ण झालेल्या प्रकरणांत 66 कोटी 31 लाख रूपये नुकसानभरपाई निश्चित झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...