आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताडोबा:बुद्ध पौर्णिमेच्या वन्यप्राणीगणनेत ताडोबात वाघ व बिबटसह 3023 प्राण्यांची गणना

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन्य जीवप्रेमी बुद्ध पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी दरवर्षी वन खात्यातर्फे वन्यजीव गणना होत असते. मचाणावरून होणाऱ्या वन्यप्राणी गणनेसाठी आगाऊ नोंदणी केली जाते. संपूर्ण विदर्भातील जंगलात ही प्राणीगणना केली जाते.

मात्र यावर्षी पण अवकाळी व मुसळधार पाऊस, चिखलमय वाटा, झाडांची पडझड या कारणास्तव बोरसह कुही, उमरेड-कऱ्हांडला वन विभागातील प्राणीगणना रद्द करण्यात आली. मात्र ताडोबातील प्राणीगणना झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

शुक्रवार 5 मे रोजी बुद्ध पौर्णीमेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील घनदाट जंगलात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तर त्याला लागून असलेल्या बफर झोनमध्ये वन कर्मचारी व निसर्ग प्रेमींकडून प्राणी गणना करण्यात आली. टीएटीआरमध्ये माेहर्ली, ताडोबा, कोळसा, कोलारा, कारवा, चंद्रपूर, मूल, पळसगाव, शिवणी, खडसंगी आदी भागात करण्यात आलेल्या प्राणीगणनेत निसर्ग प्रेमींना मोठ्या प्रमाणात प्राणी आढळले. या वन्यप्राणीगणनेत 33 वाघ, 16 बिबटासह एकूण 3023 प्राण्यांची गणना करण्यात आली.

या प्राण्यांमध्ये भेडकी 40, चितळ 1292, सांभर : 299, चौसिंगा : 01, नीलगाय : 46, रानगवा : 200, वानर : 401, रानकुत्रा : 50, रानडुक्कर : 383, अस्वल : 25, कोल्हा : 00, जवादी मांजर : 06, उदमांजर : 04, भुईरिच चांदी : 00, रानमांजर : 00, बिबट : 16, वाघ : 33, सायाळ : 07, चिंकारा : 00, मुंगुस : 15, उडणारी खार : 03, खवल्या मांजर : 00, तडस : 00, मोर : 158, मगर : 05, ससा : 05, रानकोंबडा : 23, घोरपड : 01, इतर : 10