आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:चंद्रपुरात आजपासून 35 वे राज्य पक्षिमित्र संमेलन

चंद्रपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वन अकादमी येथे ३५ वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाचे ११ व १२ मार्चदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील पक्षी अभ्यासक, तज्ज्ञ एकत्रित येणार आहेत. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक राजकमल जोब हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. पक्षिमित्रांना अभ्यास, संशोधन यावर सादरीकरण, व्याख्याने होणार असून पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम असेल. महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना, इको-प्रो संस्था, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व चंद्रपूर वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन होत आहे. सारस पक्षीचा अधिवास संवर्धन या संमेलनाच्या चर्चेचा मुख्य भाग असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...