आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात ऑपरेशन वॉश आऊट:दरोड्याच्या तयारीतील 4 जणांना अटक; अंधाराचा फायदा घेत 1 जण फरार

नागपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑपरेशन वाॅश आऊटमध्ये एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री दरोड्याच्या तयारीतील आरोपींना अटक केली. यामुळे मोठा दरोडा टाळण्यात पोलिसांना यश आले आहे. एमआयडीसी पोलिसांतर्फे सध्या ऑपरेशन वाॅशआऊट सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत रात्री पॅट्रोलिंगवर असलेल्या पोलिस पथकाला सेंट्रल एमआयडीसी रोडवरील किया शोरूम जवळ काही जण संशयास्पद स्थितीत दिसले. आराेपी दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून पथकाने अतिशय शिताफिने त्यांना अटक केली. दिनेश उर्फ दिनू लक्ष्मण भोसले (वय 30), लखन लक्ष्मण भोसले (वय 28), हेमराज सुकराम ढवळे (वय 19), ऋषभ रणजीत आत्राम (वय 19) ही अटकेतील आराेपींची नावे आहे. तर धीरज अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला.

या आरोपीं जवळून नंबर नसलेली एक फोर्ड इकोस्पोर्ट कार, दोन लोखंडी तलवार, एक चाकू, मिरची पावडर, एक लोखंडी रॉड, एक नायलॉन दोरी, एकूण सहा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास पथकात सपोनि प्रशांत साबळे, पोहवा संजय पांडे, नापोशी जितेंद्र खरपूरिया, इस्माईल नौरंगाबादे , विजय जाने, राजेश वरटी, पंकज मिश्रा, अश्विन मिश्रा यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...