आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूरमध्ये वीज पडून 4 महिलांचा मृत्यू:एकाच कुटुंबातील दोन महिला व एका तरुणीचा समावेश, वरोरा तालुक्यातील घटना

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील शेत शिवारात काम करीत असताना वादळी वारा सोबत मेघ गर्जनेसह पाऊस आल्याने शेतातील काम थांबवून दोन महिला व दोन युती घराकडे निघाल्या. रस्त्यात त्यांच्यावर वीज कोसळल्याने चौघींचाही मृत्यू झाला. ही घटना वायगाव भोयर शेतशिवारात शनिवार 30 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.

वरोरा तालुक्यातील चिमूर मार्गावर असलेल्या वायगाव भोयर येथील इंदिरा काँग्रेसचे वरोरा पंचायत समितीचे माजी सदस्य शालिक झाडे यांच्या शेतात त्यांच्या पत्नी हिरावती शालीक झाडे व 45 मधुमती सुरेश झाडे, पार्वता रमेश झाडे, रिता नामदेव गजबे या चौघी 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेतात काम करावयास गेल्या. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मेगर्जनेसह वादळी पाऊस आला. त्यामुळे त्या चौघीही घराकडे जाण्यास निघाल्या. पाऊस जोरदार असल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाचा आसरा घेतला. त्याच ठिकाणी वीज पडल्याने चौघींचाही मृत्यू झाला

एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

वायगाव भोयर येथील झाडे कुटुंबातील दोन महिला व एका युवतीचा समावेश आहे तर एक युवती ही वायगाव येथील रहिवासी आहे. मृतक मधुमती सुरेश झाडे ही वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालय वाणिज्य इंग्रजी माध्यम प्रथम वर्षाला शिकत होती

पळसाचे झाड ठरले कर्दनकाळ

जोरदार पाऊस असल्याने रस्त्याने जात असताना चौघींना पळसाचे झाड दिसले त्या झाडाचा आसरा घेतला आणि ते झाड चौघींच्या मृत्यूसाठी कारण ठरले.

बातम्या आणखी आहेत...