आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचा खरीप हंगाम सुरू झाला आहे. खरीप हंगामात खते, बियाणे व कीटकनाशके खरेदीत शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून भरारी पथके स्थापन केली जातात. यावर्षी नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि मुंबई असे सहा प्रशासकीय विभाग, एकूण ३६ जिल्हे व ३५८ तालुके मिळून सुमारे ४०० भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट आणि रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ही पथके कार्यरत असतात.
२०२१-२२ च्या खरीप हंगामात कृषी विभागाने केलेल्या कारवाईत ११ कोटी ३० लाख ९८ हजार रुपयांची खते, बियाणे व कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ४१,६६५ बियाणे िवक्रेते, ३५,८०८ खते तसेच ३८,७९४ कीटकनाशक विक्रेत्यांची नोंद आहे. राज्यात १९० बियाणे उत्पादक, ६४३ खते उत्पादक तसेच १५३ कीटकनाशक उत्पादक अाहेत. या विक्रेत्यांकडे वेळोवेळी धाडी टाकून तपासण्या करण्यात आल्या. बियाणे विक्रेत्यांकडून ६५९.९१ मे. टन, खते विक्रेत्यांचा २५१.१० मे. टन व कीटकनाशके विक्रेत्यांकडून १९२.६४ मे. टन साठा जप्त करण्यात आला. बियाणे विक्रेत्यांकडून ६ कोटी ८७ लाख २४ हजार, खते विक्रेत्यांकडून २ कोटी ५१ लाख १० हजार व कीटकनाशक विक्रेत्यांकडून १ कोटी ९२ लाख ६४ हजार रूपयांचा साठा जप्त करण्यात आला. कारवाई म्हणून १७५ बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित तर १०५ जणांचे परवाने रद्द करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.